घरमुंबई२७ वर्षीय मुलीला मिळाले जीवदान

२७ वर्षीय मुलीला मिळाले जीवदान

Subscribe

एका ३६ वर्षीय इंदूरच्या महिलेमुळे पुण्यातील २७ वर्षीय मुलीला जीवदान मिळालं. या महिलेने तरुणीला हृदय आणि फुप्फुस दान केल्यामुळे या तरुणीला नवजीवन मिळालं आहे.

एका ३६ वर्षीय इंदूरच्या महिलेमुळे पुण्यातील २७ वर्षीय मुलीला जीवदान मिळालं आहे.  पुण्यातील एका २७ वर्षीय तरुणीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यता होती. त्यानुसार एका इंदूरच्या महिलेने अवयव दान केल्यामुळे या तरुणीला जिवदान मिळाले आहे. या तरुणीवर मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयालमध्ये हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर शहरातील ३६ वर्षीय महिलेला ब्रेनहॅमरेजमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयामध्येच त्या महिलेचे ब्रेनडेड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे, तिच्या आईने आणि कुटुंबियांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तिचं हृदय, फुप्फुस, यकृत, किडनी आणि डोळे दान केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे.

तरुणीला होती हृदयाची आवश्यकता

पुणे कसबा पेठेतील २७ वर्षीय मुलीला हृदयाची आवश्यकता होती. ती अनेक महिन्यांपासून हृदय आणि फुप्फुसाच्या प्रतिक्षा यादीत होती. त्यानुसार, रुग्णालयाला इंदूरच्या महिलेची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अवयवदात्याचे हृदय आणि फुप्फुस इंदौरहून मुलुंड येथील रुग्णालयात आणण्यात आले. इंदौर ते मुलुंड ५४५ किमीचा प्रवास केल्यानंतर हे अवयव मुंबईत दाखल झाले. त्यामुळे चार्टड अकाऊंट शिकणाऱ्या मुलीला अवयवदान मिळाल्यामुळे तिला नवजीवन मिळालं आहे. ही ३६ वर्षीय महिला पेशाने शिक्षिका असून त्या आपल्या चार मुलांसोबत राहत होत्या. मात्र त्यांचे ब्रेऩडेड झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ऑगस्ट २०१८ पासून आतापर्यंत मुंबईतील हे पाचवं हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण आहे. ३६ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानाने हे शक्य झाले आहे. हे अवयव ५४५ किमी अंतरावरुन २ तास २६ मिनिटात आणले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.


वाचा – सुरतच्या मुलावर झाली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

- Advertisement -

वाचा – थायलंडमध्ये स्तन प्रत्यारोपण फसले; मुंबईत केली यशस्वी शस्त्रक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -