घरCORONA UPDATECorona Live Update : मुंबईत आज कोरोनाचे १,११५ नवे रुग्ण; ५७ जणांचा...

Corona Live Update : मुंबईत आज कोरोनाचे १,११५ नवे रुग्ण; ५७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यभरासह मुंबईतही कोरोनाचा कहर सुरू असून मुंबईत आज १ हजार ११५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ०९ हजार ०९६ वर पोहचली आहे. तर ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ०९० वर पोहचला आहे. तर आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ३६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ८० हजार २३८ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


२१४ गुन्ह्यांत ५७४ जणांवर कारवाई

- Advertisement -

मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी आज, शनिवारी २१४ गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांत दिवसभरात ५७४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६२ जणांना जामिनावर तर १११ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ३०१ जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनचं काय होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण ९ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ३ लाख ७५ हजार ७९९ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ६०१ Active कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर आजपर्यंत २ लाख १३ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरातला मृतांचा आकडा देखील चिंता वाढवणारा असून दिवसभरात एकूण २६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १३ हजार ६५६ इतकी झाली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात आज, शनिवारी २११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपचार घेणाऱ्या १५७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ९३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १९१ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील बहुतांश पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


कल्याण-डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ३३० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ३०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा)


ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज २८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ५०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ५७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ५ हजार ५७१ जणांवर उपचार सुरु आहेत.


अनलॉकनंतर नवी मुंबईतील १४६ पोलिसांना कोरोना

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सरु करण्यात आली आहे. या अनलॉकनंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. अनलॉकनंतर पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाई दरम्यान, नवी मुंबई पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईत २६ जुलै रोजी २४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये कामोठे पोलीस ठाण्यातील आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (सविस्तर वाचा)


धारावीत दिवसभरात अवघे २ रुग्ण आढळून आले असून आता धारावीतील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, दादर आणि माहिममध्ये सर्वात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दादरमध्ये २९ आणि माहिममध्ये २२ रुग्ण आढळून आले आहेत. दादर-माहिम विधानसभा क्षेत्रात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील रुग्ण कमी होण्याचा आनंद असला तरी माहिम-दादरकरांच्या पोटात वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोळा आला आहे.


गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणेमध्ये होम क्वारंटाईन असलेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे. राहुल पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून हा बंगळुरूमधल्या नामांकित कंपनीत नोकरीला होता. क्वारंटाईन असलेल्या रुममध्येच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, राहुल पाटीलच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाविरूद्ध युद्ध लढवण्यास शिवराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवराज यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांच्या अहवालावरून त्यांना कोरोनाचा किरकोळ संसर्ग झाला असून तो संसर्ग फारसा पसरलेला नाही, असे सांगितले जात आहे.  (सविस्तर वाचा)


मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममधील २९ गतीमंद मुलांना कोरोनाची लागण. (सविस्तर वाचा)


पुण्यात रात्रभरात ९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या ६७ हजार ६० तर आतापर्यंत १ हजार ६६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या ४१ हजार ३९९ झाली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह, त्यामुळे आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ बरे झाले आहेत. तर ४३७ जणांचा मृत्यू झाला. तर ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.


बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अधिकाऱ्यासह सर्व ३६ कर्मचारी क्वारंटाईन करून या पोलीस स्टेशनचा कारभार मेहकरकडे देण्यात आला आहे. तर खामगाव तालुक्यातील पिंपलगाव राजा पोलीस स्टेशन मधील ७ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने सील करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डी बी तडवी यांनी ही माहिती दिली आहे.


बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात ६९ पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ३७ तर दुपारी ७ आणि आता पुन्हा २५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.


देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि दररोज नवीन रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ पर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४८ हजार ६६१ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. (सविस्तर वृत्त)


महाराष्ट्रातील पोलिसांच्या कोरोनाबाधिताचा आकडा ८ हजार ४८३ इतका झाला आहे. तर १ हजार ९१९ इतके अॅक्टीव्ह केसेस आहेत. यापैकी ६ हजार ४७१ जण बरे झाले असून ९३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.


देशात काल १ कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ जणाच्या चाचण्या करण्यात आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.


तिरुपती येथील १०१ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे.


राज्यात आज ९२५१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ झाली असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ३८९ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ७२२७ हजार रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या २ लाख ७ हजार १९४ एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५६.५५ टक्के एवढे झाले आहे. (सविस्तर वृत्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -