घरमुंबईमुंबईत ३ हजार ५६४ जणांना हवी किडनी

मुंबईत ३ हजार ५६४ जणांना हवी किडनी

Subscribe

मुंबईत आजच्या घडीला ३ हजार ५६४ रुग्णांना किडनीची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली आहे. ६ मार्च २०१९ पर्यंत किडनीसाठी ८ हजार ३३१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

वाढत्या लोकसंख्येसोबत आजारांची संख्या आणि प्रमाण ही वाढले आहे. यातून होणारे असंसर्गजन्य आजार ज्यांची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे जाणवत आहे. आपल्या शरीरात असणारा अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण शरीराचा समतोल ठेवणारा अवयव म्हणजे किडनी. यावर आता अनेक आजारांचा परिणाम होत आहे. महाराष्ट्रासह मुंबईत अवयवदानाबाबतीत जनजागृती जरी होत असली तरी आजही अवयवांच्या प्रतिक्षा यादीत मोठी संख्या आहे. त्यातच किडनी या अवयवाच्या प्रतिक्षायादीत बरेच रुग्ण असल्याचे समोर आले आहे.

अशी आहे आकडेवारी

अवयवदानाबाबत काम करणाऱ्या झेडटीसीसी या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आजच्या घडीला ३ हजार ५६४ रुग्णांना किडनीची आवश्यकता आहे. तर, १९९७ पासून ते ६ मार्च २०१९ पर्यंत किडनीसाठी ८ हजार ३३१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, फक्त ७३४ म्हणजेच ७.१५ टक्के रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आली आहे.

- Advertisement -

“किडनी हा अवयव आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतो. उच्च रक्तदाब आणि डायबिटीसमुळे ६० ते ७० टक्के रुग्ण किडनी गमावतात. त्यामुळे ३ महिन्यांतून एकदा तरी किडनीची तपासणी करुन घ्यावी.”, असा सल्ला झेडटीसीसीचे सचिव डॉ. भरत शाह यांनी दिला आहे.

प्रत्यारोपण गरजेचं

किडनीच्या विकाराचे एकूण ५ स्टेजेस असल्यामुळे हळूहळू हा आजार वाढत जातो. त्यामुळे, रुग्ण गंभीररित्या याकडे पाहत नाही. तसंच, जगभरात ३ ते ४ लाख रुग्णांना किडनी अतितीव्र त्रास असतो. त्यातील फक्त ८ ते १० हजार रुग्णांनाच किडनी उपलब्ध होते. अशातच रुग्णांना डायलिसिसचा पर्याय दिला जातो. पण, डायलिसीस हा पूर्ण पर्याय नसून जास्तीत जास्त रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय असला पाहिजे असं मत नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रूती टापिआवाला यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -