घरमुंबईअकरावीच्या विशेष फेरीत 48 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीच्या विशेष फेरीत 48 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Subscribe

साडेसात हजार विद्यार्थी प्रवेशाविना

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीत 48 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले तरी नामांकित कॉलेजांची कट ऑफ 80 टक्क्यांच्या पलिकडेच राहिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. विशेष फेरीमध्ये राज्य बोर्डाच्या तब्बल 44 हजार 757 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आली. विशेष फेरीसाठी ५६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये राज्य बोर्डाचे 44 हजार 757 विद्यार्थी होते. त्याखालोखाल सीबीएसईचे 1,599 व आयसीएसईचे 1,546 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ६६४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेजची अ‍ॅलॉटमेंट देण्यात आली आहे. त्यामुळे सात हजार ७११ विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. अ‍ॅलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉमर्स शाखेला सर्वाधिक 31 हजार 897 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ६ हजार ५०१ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्याखालोखाल सायन्सचे 849 तर आर्ट्स 329 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

- Advertisement -

विशेष फेरीमध्ये जागा अ‍ॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना १६ व १९ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरा ते दहाव्या पसंतीक्रमातील कॉलेज अ‍ॅलॉट झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा नसेल ते प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या फेरीत पात्र ठरू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -