घरCORONA UPDATEमुंबईत ५० हजार नवीन कचरा पेट्यांची होणार खरेदी

मुंबईत ५० हजार नवीन कचरा पेट्यांची होणार खरेदी

Subscribe

मागील वेळच्या खरेदीच्या तुलनेत यंदा महापालिकेचा नफा होणार असला तरी आधीच्या कंत्राटदाराने प्रत्येक कचरा पेटी मागे ९१ रुपये अधिक घेत तब्बल ४५ लाख रुपयांचा चुना महापालिकेला लावला आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने १२० क्षमतेच्या कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे. तब्बत ५० हजार कचरा पेट्यांची खरेदी केली जात असून मागील वेळेस याच कचरा पेटीसाठी १२०६ रुपये मोजणाऱ्या महापालिकेला यंदा कंत्राटदार १११५ रुपयाला कचरा पेटी द्यायला तयार झाला आहे. त्यामुळे मागील वेळच्या खरेदीच्या तुलनेत यंदा महापालिकेचा नफा होणार असला तरी आधीच्या कंत्राटदाराने प्रत्येक कचरा पेटी मागे ९१ रुपये अधिक घेत तब्बल ४५ लाख रुपयांचा चुना महापालिकेला लावला आहे.

मुंबईत दरदिवशी सोसायट्यांमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी नगरसेवक निधीतून तसेच महापालिकेच्यावतीने १२० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्या दिल्या जातात. या कचरा पेट्या महापालिकेच्या कॉम्पॅक्टर गाड्या तसेच बंदिस्त कंटेनर्स आदींच्या माध्यमातून कचरा वाहून नेण्यास योग्य ठरतात. नगरसेवक निधीतून इमारत, वसाहतीसह शाळा, रुग्णालय आदी ठिकाणी या कचरा पेट्या पुरवल्या जातात. मागील वेळी १२० लिटर क्षमतेच्या ५० हजार कचरा पेट्यांच्या खरेदी करण्यात आली होती. ही प्रक्रीया ९५ टक्के पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेने नव्याने या कचरा पेट्यांसाठी निविदा मागवली आहे.

- Advertisement -

या निविदेमध्ये मागील कंत्राटात ज्या कचरा पेटीसाठी १२०६ रुपये एवढी बोली कंत्राटदाराने लावली होती, त्याच कचरा पेटीसाठी आता पात्र ठरलेल्या विमप्लास्ट या कंपनीने १११५ रुपये एवढी बोली लावली. म्हणजे मागील दोन ते अडीच वर्षांच्या तुलनेत ९१ रुपये एवढा दर कमी लावला. त्यामुळे या पात्र कंपनीची निवड करून त्यांच्याकडून १११५ या दराने ५० हजार कचरा पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वेळेस ५० हजार कचरा पेट्या अधिक २०टक्के याप्रमाणे ६० हजार कचरा पेट्यांची खरेदी केली होती. त्याचप्रमाणे याही कंत्राटदारांकडून ५० हजार अधिक १० हजार याप्रमाणे ६० हजार कचरा पेट्यांची खरेदी करण्यात येत आहे. विमप्लास्ट या कंपनीला ५० हजार कचरा पेट्या खरेदीसाठी ५ कोटी ५७ लाख रुपयांचे कंत्राट दिले जात असून २० टक्के अधिक परिणाम गृहित धरून १.११ कोटींचे अधिकची मान्यताही देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -