घरमुंबईमुंबईत आज 584 कोरोना बाधित, 407 रुग्ण कोरोना मुक्त

मुंबईत आज 584 कोरोना बाधित, 407 रुग्ण कोरोना मुक्त

Subscribe

मुंबई – शहरात काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पहायला मिळत आहेत. आज मुंबईत 584 कोरोना रुग्णांची नोद झाली . तर 407 रुग्ण कोरोना मुक्त झाले.

रिकव्हरी रेट 97.8 टक्के –

- Advertisement -

महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सोमवारी 407 रुग्ण कोरोना मृक्त झाले. मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के असून कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 11,08,290 इतकी झाली आहे. 24 तासांत 0 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,664 आहे. सध्या शहरात 5218 रुग्ण आहेत. शहरात आढळलेल्या नव्या 584 रुग्णांमध्ये 522 रुग्णांना अधिक लक्षणे नाहीत. रुग्ण दुपटीचा दर 1101 दिवसांवर गेला आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत –

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्वाधीक संक्रीय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईमध्ये 5218 सक्रिय रुग्ण असून पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1960 आहे. तर ठाण्यात 1662 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात एकूण 12148 सक्रिय रुग्ण आहेत.

 

राज्यात आज 1189 कोरोना रुग्णांची नोंद –

राज्यात आज कोरोनाच्या नव्या 1189 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1142 रुग्ण कोरोनामुक्त झाले.  राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाला असून  राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका  आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 79,13,209 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतके झाले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -