घरताज्या घडामोडीदादर-माहिममध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; आज आढळले ६१ नवे रुग्ण

दादर-माहिममध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; आज आढळले ६१ नवे रुग्ण

Subscribe

धारावीत दिवसभरात अवघे १३ रुग्ण आढळून आले असून आता धारावीतील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, दादर आणि माहिममध्ये धारावीच्या दुप्पट ते तिप्पट रुग्ण वाढत आहे.

धारावीत दिवसभरात अवघे १३ रुग्ण आढळून आले असून आता धारावीतील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, दादर आणि माहिममध्ये धारावीच्या दुप्पट ते तिप्पट रुग्ण वाढत आहे. दादरमध्ये २९ आणि माहिममध्ये ३२ रुग्ण आढळून आले आहेत. दादर-माहिम विधानसभा क्षेत्रात ६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील रुग्ण कमी होण्याचा आनंद असला तरी माहिम-दादरकरांच्या पोटात वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोळा आला आहे.

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र मोडणाऱ्या जी-उत्तर विभागात रविवारी दिवसभरात एकूण ७४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार १३३ एवढी झाली आहे. या विभागातील धारावीत दिवसभरात १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील एकूण रुग्ण संख्या २ हजार २४५ एवढी झाली आहे. धारावीत आतापर्यंत १ हजार ३९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ६१५ एवढ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

दादरमध्ये दिवसभरात २९ रुग्ण आढळून आले. तर माहिममध्ये ३२ रुगण आढळून आले. त्यामुळे दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे एकूण रुग्ण संख्या ही ८२० आणि १०६८ एवढी आहे. सध्या माहिममध्ये ५९२ आणि दादरमध्ये ४०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर अनुक्रमे ३८९ आणि ४५७ एवढ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद; तर १५६ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -