घरठाणेमुंबईत 77 तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी; दोन महिला गोंविदाचाही समावेश

मुंबईत 77 तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी; दोन महिला गोंविदाचाही समावेश

Subscribe

मुंबई : यंदाचा दहीहंडी उत्सव (DahiHandi festival) मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही उंचावरील दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे बघायला मिळाले. मुंबईत 77 तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी झाले आहेत. यात दोन महिला गोविंदाचाही समावेश आहे. (77 injured in Mumbai 17 injured in Thane Including a female Govinda)

हेही वाचा – ठाण्यात पावसाचा आणि गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होते. दहीहंडी उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरतात. मात्र दहीहंडी उत्सव साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास व काही प्रमाणात चुका झाल्यास गोविंदा उंच थरावरून खाली कोसळतात. यंदाही मुंबईत आज सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जखमी गोविंदाची संख्या 77 वर गेली आहे. या 77 जखमी गोविंदांमध्ये सर्वाधिक 48 जखमी गोविंदा हे शहर विभागातील आहेत. तर, पश्चिम उपनगरातील जखमी गोविंदांची संख्या 19 आहे. तसेच, पूर्व उपनगरातील जखमी गोविंदांची संख्या 10 आहे. या 77 जखमी गोविंदांपैकी 18 गोविंदांना उपचार केल्यावर बरे वाटल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. मात्र अद्यापही 59 जखमी गोविंदांवर रूग्णालय स्तरावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Photo : मुंबई, ठाण्यासह राज्यभर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह

- Advertisement -

ठाणे शहरातही संध्याकाळी सहापर्यंत 17 गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये 9 गोंविदांना कळवा रुग्णालयात तर, 4 गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर चार जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला गोंविदाचा समावेश आहे. यातील एका महिला गोविंदा मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे. याशिवाय एका गोविंदाचा हात फॅक्चर झाला असून उर्वरित सर्व जण किरकोळ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्यांमध्ये अनिकेत अनिल मेंढकर (रा.चिराग नगर, ठाणे.), अक्षय कडू (25) मुलुंड पूर्व येथील नरेंद्र धामनराव वाल्मिक, दिव्यातील पीयूष पी. लाला (18), सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (27), केदार पवार (28), गौरव विष्णू चौधरी (20), कल्याणचा चैतन्य हेमंत ढोबळे (21), दिघा येथील आकाश जयचंत चव्हाण (20) या 9 जणांसह कांजूर मार्ग येथील अनिकेत खोडे (21), जोगेश्वरी येथील अर्चना खैरमार (37) आणि गोरेगाव येथील राहुल केदारे (29) तसेच विरार येथील पृथ्वी पांचाळ अशी 13 जखमी गोविंदांची नावे आहेत.

रूग्णालय निहाय जखमी गोविंदाबाबत माहिती

शहर विभागात एकूण 28 गोविंदा जखमी

1) केईएम रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 31 असून 7 रुग्णालयात दाखल असून 24 जणांवर ओपीडी स्तरावर उपचार सुरू आहेत तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

2) सायन रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 7 असून सर्व ओपीडी स्तरावर घेत आहेत उपचार

3) नायर रूग्णालय : तीन गोविंदा जखमी झाले असून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, एकजण रुग्णालयात उपचार घेत आहे.

4) जे.जे. रूग्णालय : चार गोविंदा जखमी झाले असून यापैकी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, एकावर उपचार सुरू आहेत.

5) जी.टी. रूग्णालय : दोन गोविंदा जखमी झाले असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

6) पोद्दार रूग्णालय : 16 गोविंदा जखमी झाले असून दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

७) सेंट जॉर्ज : तीन गोविंदा जखमी होते, मात्र त्यांना उपचार घेतल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

८) बॉम्बे रूग्णालय : एका गोविंदावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – ठाण्यात पावसाचा आणि गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

पश्चिम उपनगरात चार गोविंदा जखमी

1) व्ही.एन. देसाई रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 4 असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२) कूपर रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 6 असून चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांवर उपचार सुरू आहेत.

३) वांद्रे भाभा रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 3 असून त्यांना 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहेत.

४) जोगेश्वरी ट्रॉमा केअर : जखमी गोविंदांची संख्या 4 असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

५) डॉ. आंबेडकर रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 9 असून आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, एकावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Photo : मुंबई, ठाण्यासह राज्यभर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह

पूर्व उपनगर 3 गोविंदा जखमी 

1) राजावाडी रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 10 असून यापैकी आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२) शताब्दी रूग्णालय : जखमी गोविंदांची संख्या 3 असून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एकावर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -