घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्या शाळांचा ९३.२५ टक्के निकाल!

मुंबई महापालिकेच्या शाळांचा ९३.२५ टक्के निकाल!

Subscribe

बृहन्मुंबई महापालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षणाबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जात असताना पालिकेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दहावीच्या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ९३.२५ टक्के लागला आहे. मागील आठ वर्षातील पालिकेच्या शाळांचा हा सर्वाधिक चांगला निकाल ठरला आहे. पालिकेच्या ७६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांनीही आपला दर्जा अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे.

राज्याच्या निकालामध्ये मुंबई विभागाच्या निकालामध्ये वाढ झाली असताना मुंबई महापालिकेच्या शाळांच्या निकालामध्ये यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. गतवर्षी मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल अवघा ५३.१४ टक्के लागला होता. यंदा दहावीचा निकाल ९३.२५ टक्के इतका लागला आहे. पालिकेच्या २१८ माध्यमिक शाळांमधून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेसाठी १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल ९३.२५ टक्के लागला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील संकु संजीवा अंजनेयुलु व विलेपार्ले मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील महेक गांधी या दोन विद्यार्थिनींनी ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रभादेवी मनपा माध्यमिक शाळेतील हिना तुळसकर ९५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर सांताक्रुझ मनपा माध्यमिक उर्दू शाळेतील कुलसूम तारीक हिने ९४.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -