घरक्राइमउपनिबंधक सोसायटी कार्यालयातील लाचखोर लिपीक ACB च्या जाळ्यात; 45 हजारांची मागितली होती...

उपनिबंधक सोसायटी कार्यालयातील लाचखोर लिपीक ACB च्या जाळ्यात; 45 हजारांची मागितली होती लाच

Subscribe

लाचलुचपत विभागांनी अधिक तपास केल्यास उपनिबंधक यांचा सहभाग असल्याचेही उघड होणार आहे.

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरमधील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपीकाला भाईंदरमधील एका सोसायटीचे ऑडीट अहवाल करण्यासाठी मुख्य लिपिकाने 50 हजाराची मागणी करून तडजोडी अंती 45 हजाराची मागणी करून 25 हजारांचा पहिला हप्ता घेताना रंगेहाथ अटक केली आहे. लाचखोर आरोपीचे नांव शेख अली हैदर दगडू मिया (35) मुख्य लिपिक, उपनिबंधक सहकारी संस्था, भाईंदर यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तर यात लाचलुचपत विभागांनी अधिक तपास केल्यास उपनिबंधक यांचा सहभाग असल्याचेही उघड होणार आहे. (A bribe-taking clerk in the Sub-Registrar Society’s office in ACB’s net; A bribe of 45 thousand was demanded)

हेही वाचा : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद

- Advertisement -

सदरील सापळ्यातील मूळ तक्रारदार यांच्या अर्जावरून त्यांच्या सोसायटीला नोटीस बजावणे, व्यवस्थापक ठेवणे, लेखापरीक्षण करण्याकरीता 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 45 हजार स्वीकारण्याचे मान्य करून त्यापैकी पहिला हप्ता 25 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः त्यांच्या कार्यालयात स्वीकारले असता आलोसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर सदरचा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन थोरात, सहा. पोलीस उपनिरीक्षक भावसार, पोलीस हवालदार तारी, पोलीस नाईक पारधी, महिला पोलीस शिपाई ठोंबरे, चालक सांबरे यांनी केलेली आहे.

हेही वाचा : पक्षफुटीनंतर शरद पवार गट सक्रीय; रोहणी खडसेंवर सोपवली मोठी जबाबदारी

- Advertisement -

आठ महिन्यांत लाचखोरीचे 23 गुन्हे

राज्यात आठ महिन्यांत आतापर्यंत लाचखोरीचे 564 गुन्हे दाखल झाले असून, त्यमध्ये 789 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर यामध्ये मागील आठ महिन्यांत एकट्या मुंबई विभागात लाचखोरीचे 23 गुन्हे दाखल झाले असून, 27 लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली आहे. यासोबतच चार अपसंपदेचे सहा आरोपी अटक करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -