घरमहाराष्ट्रज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद, उद्धव ठाकरेंचा...

ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Subscribe

शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही कारण आई ही शेवटी आई असते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया – उद्धव ठाकरे  

- Advertisement -

तुम्हाला असं वाटत नाही का, की जे तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांनाच तुम्ही सर्वाधिक दिलं आहे, असा प्रश्न शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना खासदरा संजय राऊत यांनी विचारला. याला उत्तर देताना आहेच… त्यांना भरभरून दिलंय! आणि ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांना कमी मिळालं ते आपल्याबरोबर राहिलेत. मला हेच म्हणायचंय की, हीच शिवसेनेची ताकद आहे. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोक घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा.. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया.., असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद – उद्धव ठाकरे  

- Advertisement -

पुढे ही साधी लोक होती आणि पुन्हा तेच म्हणेन की चूक माझी आहे की त्यांना ताकद दिली. पण त्या ताकदीने त्यांनी नुसता उलटा वार नाही केला तर राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. कारण आई ही शेवटी आई असते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -