घरमुंबईमुंबई दर्शनात आता सिनेमाचे लाईव्ह शुटींग पाहण्याची पर्वणी

मुंबई दर्शनात आता सिनेमाचे लाईव्ह शुटींग पाहण्याची पर्वणी

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चित्रपटांने लाईव्ह शुटींग पाहता येणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राइव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी एका खास तयार करण्याता आली आहे. या खास बसचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

महाराष्ट्र हा पर्यटकांसाठी महत्त्वाचे असे पर्यटन स्थळ आहे. बॉलिवूड हा देशातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे. चित्रपटांने शुटींग पाहण्यासाठी लोक नेहमी गर्दी करत असतात. चित्रपटाचे चित्रीकरण कसे होते हा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चित्रपटांने लाईव्ह शुटींग पाहता येणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राइव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी एका खास तयार करण्याता आली आहे. या खास बसचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या संबंधित माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टिने पर्यटन विभागाकडून विविध कंपन्यासोबत सामजस्य करार करण्यात आला आहे.

- Advertisement -

बॉलिवूड हा देशभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे, त्यामुळेच लाईव्ह फिल्म शुटींग पहायला मिळणे हे पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना चित्रपटांचे लाईव्ह शुटींग पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. महाराष्ट्र हा विविध खाद्यसंस्कृती असलेले राज्य आहे. राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यातील स्थानिक तसेच घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यत पोहचवण्यासाठी फुड लाईफ कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यातील खाद्यसंस्कृती पुढे येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक आणि घरगुती व्यावसायिकांना रोजगार मिळणार आहे.

राज्यात असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती तसेच रस्त्यांची, चौकांची नावे त्या नावांचा इतिहास यांची माहिती पर्यटकांना देण्यासाठी एक ऑफलाईन क्युआर कोड तयार करण्यात येणार असल्याची आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हा क्युआर कोड तयार करण्यासाठी पोलक्स स्टार LLP या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्राइव्हेट लिमिटेड सोबतही करार केल्याचे सांगितले आहे. राज्याच्या कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरणाची अंबलबजावणी केली जात आहे त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाचा विकास करणे हे आमचे ध्येय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींचा पर्यटन विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वर्षा राऊत यांनी ईडीकडे मागितली ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -