घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रोत्सवातून आग्रीपाडा मंडळाचा 'आरे बचाव'चा संदेश

नवरात्रोत्सवातून आग्रीपाडा मंडळाचा ‘आरे बचाव’चा संदेश

Subscribe

आग्रीपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने त्यांच्या सजावटीद्वारे दिला 'आरे वाचवा' हा संदेश

मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी मुबंईच्या आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याचा निर्णय सध्याच चर्चेत आहे. अनेक पर्यावरणवादी या वृक्षतोडीचा विरोध करत असले तरी सामान्य माणसालाही याची जाणीव व्हायला हवी. या भावनेतून आग्रीपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यावर्षी ‘आरे वाचवा’ या विषयाला घेऊन सजावट आणि देखावा केला आहे. आग्रीपाडा मंडळाचे नवरात्र साजरे करण्याचे हे ४६ वर्ष आहे. आग्रीपाडा मंडळ गणेशोत्सवाप्रमाणेच समाज प्रबोधन करण्याचे काम नवरात्र उत्सवातून करत असतात.

मागच्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. विकासाच्या नावाखाली माणसाने निसर्गाचा नाश केला. मंडळाने मंडपात एका बाजुला १९१९ मधील मुंबई उपनगराचे हिरवेगार दृष्य तर दुसऱ्या बाजूला २०१९ मधील मुंबई शहरातील झाडे नसलेले, पूर आणि कार्बन उत्सर्जन झालेल्या दृष्यांची तूलना दाखवली आहे. स्थानिक रहिवासी विलास बसनेकर यांनी हा देखावा साकारला आहे. भाविक देवीच्या दर्शनासाठी जेव्हा मंडपात प्रवेश करतात तेव्हा त्यांना एक माहितीपट दाखवला जातो. मनुष्य अनेक वर्षांपासून वसुंधरेचा नाश करत आला आहे. पण ‘आता तरी सुधर’ असा संदेश वसुंधरा देते. हा माहितीपट मंडळाचे कार्यकर्त्या आणि स्थानिक रहिवासी साई शिंदे यांनी बनवला आहे.

- Advertisement -

“दरवर्षी आम्ही देखाव्यासाठी एक सामाजिक विषय निवडतो. गेल्या वर्षी आम्ही मंडळाला १०,००० वृक्ष रोपांनी सजवले होते. त्यानंतर ती त्या झाडांचे पुनर्रोपण रायगडच्या एका गावात केले होते. २०१२ ला निर्भया प्रकरण घडले होते. त्यावेळी महिला सक्षमीकरण, तसेच महिला अत्याचाराच्या विरोधात जनजागृती केली होती”, अशी प्रतिक्रिया मंडळाचे सहसचिव अक्षय बिरवाडकर यांनी दिली. जेव्हा आम्ही म्हणतो ‘आरे वाचवा’ तेव्हा आम्ही विकासाला विरोध करत नाहीत. आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी वृक्षतोड नको. सध्या तापमानात वाढ होत आहे, या परिस्थितीत झाडे तोडणे पर्याय नाही आपल्यासाठी हितकारक नाही” असेही बिरवाडकर म्हणतात.

आग्रीपाडा मंडळ पुढच्या वर्षासाठी प्लास्टिक क्लीन-अप ड्राइव्ह आयोजित करण्याचा विचार करत आहे. देखाव्यासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर करून सजावट करण्यात येईल, अशी माहिती बिरवाडकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -