घरमुंबईAbhishek Ghosalkar: घोसाळकर हत्येप्रकरणी कुटुंबीयांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Abhishek Ghosalkar: घोसाळकर हत्येप्रकरणी कुटुंबीयांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Subscribe

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करताना खूप घाई केली. तसंच, आपलं म्हणणं नीट ऐकून घेतलं गेलं नाही, असा आरोप अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी केला आहे.

मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करताना खूप घाई केली. तसंच, आपलं म्हणणं नीट ऐकून घेतलं गेलं नाही, असा आरोप अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी केला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. तसंच, सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. (Abhishek Ghosalkar Family alleges Mumbai police in Ghosalkar murder case)

घोसाळकर कुटुंबीयांचा नेमका आरोप काय?

मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करताना खूप घाई करत आहेत. पोलिसांनी घाईघाईतच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, असा आरोप घोसाळकर कुटुंबीयांचा आहे. गुन्ह्याची नोंद झाल्याानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते. मात्र, मुंबई पोलिसांनी केवळ 60 दिवसांतच तपास आटोपून आरोपपत्र दाखल केलं. मूळ तक्रारदार असलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचं म्हणणं मुंबई पोलिसांनी नीट ऐकून घेतलं नाही, असंही घोसाळकर यांच्या कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आलं.

- Advertisement -

उच्च न्यायालयाचे निर्देश काय?

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हात आहे, असा घोसाळकर कुटुंबीयांचा संशय आहे. त्यादृष्टीने तुम्ही तपास केला का? अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांकडे केली. तसंच, आतापर्यंत याप्रकरणी केलेल्या तपासाचा आणि जमा केलेल्या पुराव्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांनी दिले आहेत.

या खटल्यातील आरोपी अथवा संशयितांच्या मोबाइलमधील नोंदी तपासल्या आहेच का? त्यातून काय माहिती पुढे आली? असा प्रश्नही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना केला. तसंच, त्याचा तपशीलही सादर करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपास संबंधित परिमंडळाच्या उपायुक्तांच्या देखरेखीखाली केली जात आहे. त्यामुळे उपायुक्त, याचिकाकर्ते आणि तपास अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन कुटुंबीयांचा संशय असलेल्या व्यक्ती आणि हत्येशी संबंधित अन्य पैलूंबाबत चर्चा करावी, असं आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले.

त्या रात्री घडलं काय?

अभिषेक घोसाळकर हे 8 फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिस नरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसभाईने अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या दहिसर येथील कार्यालयात साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. या कार्यक्रमापूर्वी दोघांनी मिळून फेसबूक लाइव्ह केलं होतं. या फेसबूक लाइव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिसशी असलेले सर्व जुने वाद संपुष्टात आल्याची घोषणा केली होती. यानंतर काहीवेळातच मॉरिसने एका पिस्तुलातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर मॉरिसने स्वत: वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

(हेही वाचा: Sanjay Raut : फडणवीसांच्या मनात अटकेची भीती म्हणून…, राऊतांचा धक्कादायक दावा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -