घरमुंबईआघाडीसंदर्भातील प्रस्ताव प्रलंबीत; अबू आझमींचा स्वबळावर इशारा

आघाडीसंदर्भातील प्रस्ताव प्रलंबीत; अबू आझमींचा स्वबळावर इशारा

Subscribe

जर आमची आघाडी झाली नाही. तर आगामी लोकसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे आम्ही आघाडीसंदर्भातील प्रस्ताव दिलेला आहे. मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. जर आमची आघाडी झाली नाही. तर आगामी लोकसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमदार अबु आझमी यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान यावेळी त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली.

सत्ताधारी, निरुपम यांच्यावर टीका 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी वरील भूमिका जाहीर केली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते अब्दुक कादिर, समाजवादी पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते रईस शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अबु आझमी म्हणाले की, सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन लोकसभेत भाजप आणि सेनेच्या पार्टीला पराजित करणे गरजेचे आहे. तर आगामी निवडणुकीत पक्षाकडून उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि नांदेड यापैकी एका जागेवर निवडणुक लढवणार आहे. जर महाआघडीत आम्हाला ही जागा मिळाली नाही. तर आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर गेल्या काही दिवसांपासून मनसेला माघाडीत घेण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी भाष्य केले. मनसेला या महाआघाडीत सामील करण्यास आमचा विरोध असणार आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने अनेक वेळा भूमिका जाहीर केली आहे. अशावेळी जर त्यांना महाआघाडीत घेतले तर त्यास संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही विरोध करु, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर संजय निरुमप यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. पुलवामा येथे झालेल्या हल्ला हे सत्ताधार्‍यांचे अपशय असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -