घरमुंबईधारावीतील सरवाना ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी आरोपीला अटक

धारावीतील सरवाना ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी आरोपीला अटक

Subscribe

धारावी येथील सरवाना ज्वेलर्समध्ये झालेल्या सव्वासहा लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. मनिषकुमार देवीलाल दर्जी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत विक्रम भवरलाल पुरोहित हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सुरेशकुमार रतनचद जैन हे सोन्याचे व्यापारी असून ते धारावी येथील शीव-वांद्रे लिंक रोडवरील गिरगाव टॉवर इमारतीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या मालकीचे धारावी येथे सरवाना ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. एप्रिल २०१६ रोजी त्यांनी विक्रम पुरोहित याला त्यांच्या दुकानात नोकरीसाठी ठेवले होते. गेल्या तीन वर्षांपासून तो तिथे काम करत होता. त्याच्यावर सुरेशकुमार यांचा प्रचंड विश्वास होता. १३ ऑक्टोबरला त्यांच्या दुकानातून विक्रमने २२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर सुरेशकुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी धारावी पोलिसांना ही माहिती दिली. याप्रकरणी त्यांचा नोकर विक्रम पुरोहितविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला होता. विक्रम हा राजस्थानचा रहिवाशी असल्याने तो गावी पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी धारावी पोलिसांचे एक विशेष पथक तिथे गेले होते. विक्रम तिथे पोलिसांना सापडला. तपासात या चोरीमध्ये त्याला मनिषकुमार दर्जी याने मदत केल्याचे उघडकीस आले होते. त्याचा शोध घेताना शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

पोलीस तपासातून समोर आले आहे की, मनिषकुमार हा सराईत गुन्हेगार असून त्याला अशाच एका चोरीच्या गुन्ह्यांत बोरिवली पोलिसांनी अटक केली होती. या चौकशीत त्याने सरवाना ज्वेलर्समध्ये विक्रमच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -