घरमुंबई‘त्या’ हॉस्पिटलसह सहा हॉस्पिटलवर होणार कारवाई

‘त्या’ हॉस्पिटलसह सहा हॉस्पिटलवर होणार कारवाई

Subscribe

तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांचा अहवाल

करोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जात नसल्याची बातमी दैनिक ‘आपलं महानगर’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर वसई तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची दखल घेत वसईतील सहा हॉस्पिटल महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत करोना रुग्णांवर उपचार करीत नाहीत, तसेच करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल पालघर जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे पाठवला आहे.

विरारमधील करोनाबाधित रुग्ण संदीप मौर्या करोनावर उपचार करण्यासाठी वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये 7 जूनला दाखल झाले होते. त्यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यासंबंधीची सर्व कागदपत्रांची पूर्तता या हॉस्पिटलने केली होती. मात्र, बुधवार, 10 जूनला हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला एक लेखी पत्र दिले. त्यात हॉस्पिटलच्या डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याने आपल्यावर उपचार करता येणार नाहीत. तसेच आपली महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पूर्तता झालेली नसल्याने हॉस्पिटलचे बिल शासकीय दरानुसार चुकते करून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे, असे म्हटले होते. त्यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने शुक्रवार 12 जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती.

- Advertisement -

या वृत्ताची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी पालघर जिल्हा शल्य चिकित्सकांकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. गोल्डन पार्क हॉस्पिटलसह (गोल्डन पार्क कॉम्पलेक्स, नवघर माणिकपूर, वसई प.), अलायन्स हॉस्पिटल (तुळींज, नालासोपारा), बदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (समेळपाडा, नालासोपारा प.), लाईफकेअर चॅरिटेबल हॉस्पिटल (मार्टीन कॉम्प्लेक्स, न्यू लिंक लोड, नालासोपारा पूर्व), विजया लक्ष्मी हॉस्पिटल (ओस्वाल नगर, नालासोपारा प.) आणि जनसेवा हॉस्पिटल (दत्तानी मॉलजवळ, उमेळमान, वसई प.) ही हॉस्पिटल महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सामाविष्ट आहेत. मात्र, या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जात नाहीत. तसेच करोना रुग्णांनाही उपचारासाठी दाखल केले जात नाही. त्यामुळे सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस जाधव यांनी केली आहे.

‘त्या’ हॉस्पिटलसह सहा हॉस्पिटलवर होणार कारवाई
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -