घरताज्या घडामोडी'ती' कोसळलेली झाडे, फांद्या उचलण्यासाठी १.२३ कोटींचा अतिरिक्त खर्च

‘ती’ कोसळलेली झाडे, फांद्या उचलण्यासाठी १.२३ कोटींचा अतिरिक्त खर्च

Subscribe

पालिकेने अगोदरच कंत्राटदार नेमला असता तर हा अतिरिक्त खर्च करावा लागला नसता

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे, फांद्या यांच्या छाटणीसाठी कुलाबा व वांद्रे या विभागात कंत्राटदार न नेमल्यामुळे वादळाच्या तडाख्याने या विभागात पडलेली झाडे, फांद्या उचलण्यासाठी पालिकेला जुन्याच कंत्राटदारावर १ कोटी २३ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागला, अशी खंत विरोधी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत वृक्ष प्राधिकरणची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत झाडे, फांद्या यांची छाटणी करण्यासाठी कुलाबा व वांद्रे या विभागात पालिकेने कंत्राटदार न नेमल्याचे पडसाद विरोधकांकडून उमटले. यावेळी, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विरोधी पक्षाकडून चांगलीच तोफ डागण्यात आली व या गंभीर घटनाप्रकाराबाबत जाब विचारण्यात आला.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे व फांद्या यांची छाटणी करण्यात येते. त्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते. या कंत्राटदारांनी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची, फांद्यांची छाटणी करून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्यांचीच असते. मात्र वांद्रे व कुलाबा या दोन विभागात कंत्रातदारांची नेमणूक करण्यात न आल्याने मध्यंतरी झालेल्या वादळाच्या तडाख्याने मुंबई परिसरात जवळजवळ ८५० पेक्षाही जास्त झाडे, १२०० पेक्षाही अधिक फांद्या यांची पडझड झाली. त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.

- Advertisement -

कुलाबा व वांद्रे या विभागात कोसळलेली झाडे, फांद्या या उचलण्यासाठी कंत्राटदार न नेमल्याने पालिकेला नाईलाजाने जुन्या कंत्राटदारामार्फत ही झाडे, फांद्या यांची उचल करून वाहतूक करावी लागली. त्यासाठी पालिकेला कुलाबा विभागात ७२ लाख ४० हजार तर वांद्रे विभागात ५० लाख ९१ हजार रुपये खर्च करावे लागले. जर पालिकेने अगोदरच कंत्राटदार नेमला असता तर हा अतिरिक्त खर्च करावा लागला नसता, अशी खंत विरोधी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.

पालिकेच्या ‘ए’ वार्डातील कुलाबा परिसरातील धोकादायक झाडे,फांद्या यांची छाटणी करण्यासाठी व त्यांची उचल करून वाहतूक करण्यासाठी पालिकेने २०१९ मध्ये २ वर्षांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करून त्याला ३ कोटी ४४ लाख रुपये देण्याबाबत निर्णय घेतला होता. गेल्या जून २०२१ मध्ये या कंत्राटाराची मुदत संपली. त्यामुळे लगेचच दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करणे अपेक्षित होते. मात्र तौक्ते चक्रीवादळात या विभागातील झाडे उचलण्यासाठी ७२ लाख ४० हजार रुपये कंत्राटदाराला मोजावे लागले आहेत. परिणामी मूळ कंत्राटाच्या किंमतीत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, वांद्रे परिसरातही धोकादायक झाडे, फांद्या छाटणी करून त्यांची वाहतूक करून विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने ५ कोटी ९ लाख रुपयांचे एका कंत्राटदाराला दिले होते. सदर कंत्राट कामाची मुदत ही जून २०२१ मध्ये संपल्याने पावसाळ्यात त्याच कंत्राटदाराकडून काम करण्यात आले. यासाठी कंत्राटदाराला ५० लाख ९१ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागले आहेत. परिणामी मूळ कंत्राटकामाच्या किंमतीत २०% वाढ झाली. यासंदर्भातील अतिरिक्त खर्चाचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.


हेही वाचा – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -