घरक्रीडाAfghanistan crisis : अफगाणिस्तान क्रिकेट संघाची काबुलमध्ये पुन्हा सरावाला सुरुवात

Afghanistan crisis : अफगाणिस्तान क्रिकेट संघाची काबुलमध्ये पुन्हा सरावाला सुरुवात

Subscribe

अफगाणिस्तानचा संघ दोन आठवड्यांनी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकल्याचे चित्र आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये संकट निर्माण झाले आहे. या अराजकतेमुळे अफगाण नागरिक देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, या परिस्थितीतही अफगाणिस्तान क्रिकेट संघाने राजधानी काबुलमध्ये पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. खेळाडूंनी उत्साहात सराव केल्याची माहिती अफगाण क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष हमीद शिनवारी यांनी दिली. अफगाणिस्तानचा संघ दोन आठवड्यांनी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका श्रीलंकेत पार पडेल.

क्रिकेटबाबत चिंता नाही

खेळाडूंनी उत्साहात सराव केला. आम्ही लवकरच खेळाडूंना श्रीलंकेत पाठवू. हवाई वाहतूक सुरु करण्याबाबत आम्ही प्रशासनासोबत चर्चा केली आहे, अशी माहिती हमीद शिनवारी यांनी दिली. तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा असताना पूर्वीही क्रिकेट खेळले जात होते आणि आताही आम्हाला अडचण येईल असे वाटत नाही, असा विश्वासही शिनवारी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अफगाणिस्तानात अवघड परिस्थिती 

अफगाणिस्तानात अराजकतेमुळे असंख्य अफगाण नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी सोमवारी काबुल विमानतळावर गर्दी केली. यावेळी अमेरिकेच्या C-17 लष्करी विमानात प्रवेश न मिळाल्याने बिथरलेले नागरिक विमानाच्या चाकावर बसले, तर काहींनी विमानाच्या खालच्या बाजूला पकडून राहण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रयत्नातच काहींचा विमानातून पडून मृत्यूही झाला.


हेही वाचा – टीम इंडियाची निवड पुढील महिन्यात? निवड समितीपुढे अनेक प्रश्न

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -