घरमुंबईबेकायदा सरकार आमची स्वप्ने थांबवू शकत नाही; इलेक्ट्रिक बसवरून आदित्यांचा टोला

बेकायदा सरकार आमची स्वप्ने थांबवू शकत नाही; इलेक्ट्रिक बसवरून आदित्यांचा टोला

Subscribe

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन हा टोला लगावला. आम्ही ९०० ईलेक्ट्रिक दुमजली बसची घोषणा केली होती. त्यातील ५० बसेस सुरुवातीला येणार होत्या. त्यांपैकी दोन बस आल्या आहेत. लवकरच इतर सर्व बसेस दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच आम्ही दहा हजार ईलेक्ट्रिक बसचे ध्येय ठेवले होते. ह्या बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही घेणार होतो. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणासाठी या बसेस घेण्याचे उद्दिष्ट्य होते. संपूर्ण महाराष्ट्रात ईलेक्ट्रिक बस घेण्याचा आमचा विचार होता, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईः मुंबईकरांसाठी दुमजली ईलेक्ट्रिक बस घेणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे आणि मी गेल्या वर्षी दिले होते. ते आज पूर्ण झाले आहे. बेकायदा सरकार आमची स्वप्ने थांबवू शकत नाही, असा टोला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन हा टोला लगावला. आम्ही ९०० ईलेक्ट्रिक दुमजली बसची घोषणा केली होती. त्यातील ५० बसेस सुरुवातीला येणार होत्या. त्यांपैकी दोन बस आल्या आहेत. लवकरच इतर सर्व बसेस दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच आम्ही दहा हजार ईलेक्ट्रिक बसचे ध्येय ठेवले होते. ह्या बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही घेणार होतो. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणासाठी या बसेस घेण्याचे उद्दिष्ट्य होते. संपूर्ण महाराष्ट्रात ईलेक्ट्रिक बस घेण्याचा आमचा विचार होता, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाची एसी इलेक्ट्रिक दुमजली बस बेस्टच्या परिवहन विभागाच्या बस ताफ्यात सोमवारी दाखल झाली. त्यामुळे आता मुंबईकरांचा दुमजली बसमधील प्रवास गारेगार होणार आहे. विशेष म्हणजे या बसला दोन दरवाजे आहेत. जुन्या डबल डेकर बसला एकच दरवाजा होता. त्यामुळे मंबईकरांची गैरसोय होणार नाही.

या बसमध्ये, आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था आहे. खालील भागात ३५ आसने तर वरील भागात ३० आसने अशी एकूण ६५ आसनांची व्यवस्था या बसमध्ये आहे. ही संपूर्ण एसी बस असल्याने या बसला मुंबईकरांची चांगली पसंती मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बेस्टने जुन्या दुमजली बसगाड्या भंगारात मोडीत काढत त्याऐवजी आता नवीन एसी इलेक्ट्रिक दुमजली गाड्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या बसची किमत ६० कोटी आहे. या बसचे सर्वांकडून कौतुक झाले. विशेष म्हणजे या दुमजली बसला दोन दरवाजे आहेत. त्यामुळे या बसला अधिक पंसती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -