घरमुंबईआदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतला पुढाकार

Subscribe

फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने मित्र सहज भेटतात, पण या भेटीतून अनेकदा चांगल्या गोष्टीही घडत असतात. नुकतेच वांद्रे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील 1986-87 बॅचचे विद्यार्थी तब्बल 32 वर्षांनंतर भेटले, पण या भेटीमध्ये त्यांनी फक्त मजा न करता भविष्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे.

वांद्रे पूर्वेकडील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील 1986-87 बॅचमधील दहावीतील विद्यार्थी गतवर्षी तब्बल ३१ वर्षांनी भेटले. गतवर्षी भेटल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा भेटायचे असे त्यांनी ठरवले. त्यानुसार यावर्षी 23 जूनला मालाडमधील ग्रीन व्हिलेज रिसॉर्टमध्ये एकत्र येण्याचे ठरले. यातील अनेक जण विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर कामाला आहेत, तर काही सरकारी कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. काही जणांचा स्वत:चा व्यवसाय आहे, तर काही महिला या स्वत:च्या आयुष्यामध्ये रममाण झाल्या आहेत.

- Advertisement -

असे प्रत्येक जण स्वत:च्या आयुष्यात रममाण असताना पुन्हा शाळेतील जुन्या मित्रांना भेटण्याच्या आनंदापोटी एकत्र आले. यातील काही जण पहिल्यांदाच भेटणार होते, तर काही जण यापूर्वी एकमेकांना भेटले होते. 32 वर्षांनंतर प्रथमच भेटताना अनेकांना एकमेकांना ओळखणेही अवघड झाले होते. परंतु, शाळेतील घडलेल्या किस्स्यांमुळे ते शाळेतील आठवणींमध्ये हरवून गेले. यावेळी डान्स, मस्ती, खाणे, कविता वाचन, अंताक्षरी, संगीत खुर्ची अशी धमालमस्ती त्यांनी केली.

32 वर्षांनंतर भेटल्यानंतर धम्माल मस्ती केल्यानंतर आपल्या या भेटीतून काही सकारात्मक कार्य घडावे असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यानुसार प्रत्येकांनी आपापल्या मर्जीनुसार निधी जमा करण्याचे ठरवले.

- Advertisement -

जमा होणार्‍या निधीतून आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर दिवाळीमध्ये आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांना दिवाळी फराळ वाटप करण्याचेही ठरले. यामुळे आपल्या एकत्र येण्यातून एक समाजोपयोगी कार्य घडण्याचे समाधान मिळण्याची भावना त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. राजेंद्र राणे, राजेश आसवले, सुबोध तांबे, सचिन जाधव, भरत पाटकर, संजय वाघमरे, नरेंद्र पडवळ, राजेश शिवलकर व स्वप्नीला तारकर यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -