घरCORONA UPDATEआता Black Fungus नंतर कोरोना रुग्णांना गँगरीनचा धोका,मुंबईत १२ रुग्णांवर उपचार

आता Black Fungus नंतर कोरोना रुग्णांना गँगरीनचा धोका,मुंबईत १२ रुग्णांवर उपचार

Subscribe

अचानक पोटात वेदना होत असतील तर त्यापासून सावधान राहण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

राज्यासह देशात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) किंवा ज्याला काळी बुरशी (Black Fungus) असे म्हटले जाते त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कोरोना नंतर होणाऱ्या या भयंकर आजारामुळे लोक हैराण झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि त्यात काळ्या बुरशीच्या आजाराने लोकांवर फार वाईट परिणाम झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४२१ जणांचा काळ्या बुरशीमुळे जीव गेला आहे. पण आता रुग्णांमध्ये आणखी एक संकट येत आहे ते म्हणजे आता काळ्या बुरशीनंतर कोरोना रुग्णांना गँगरीनचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या आतड्यांवर फार गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत गँगरीनचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईच्या रुग्णालयात १२ रुग्णांवर उपचार केले आहेत. काळ्या बुरशीने हैराण झालेल्यांना आता गँगरीनचाही सामना करावा लागणार आहे. (after Mucormycosis Black Fungus, corona patients are risk of gangrene, treatment 12 patients in Mumbai)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांनी जवळपास १२ जणांवर उपचार केले आहेत. रुग्णांच्या पोटात अचानक तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे अचानक पोटात वेदना होत असतील तर त्यापासून सावधान राहण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्याचप्रमाणे असे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या आजारावर योग्य वेळी उपचार झाले नाहीत तर हा आजार अधिक घातक ठरु शकतो,असे वॅस्क्युलर सर्जन डॉक्टर अनिरुद्ध भुइयां यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हा फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्याचप्रमाणे तो गॅस्ट्रोइन्टेस्टेनल ट्रॅकवरही हल्ला करु शकतो. गॅस्ट्रोइन्टेस्टेनल हा एक पोटाचा दुर्मिळ आजार आहे. ज्यात कोरोना रुग्णांच्या आतड्यांमध्ये गुठळ्या होतात. पोटात गुठळ्या झाल्याने छोट्या आतड्यातील रक्तपुवठ्यावर परिणाम होतो. ज्यामुळे गँगरीनची समस्या निर्माण झाली आहे. आतड्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्यांना मेडिकल टर्ममध्ये AMI (Acute mesenteric ischemia) असे म्हणतात. १६ ते ३० टक्के कोरोना रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टेनलची लक्षणे दिसून आली आहेत.


हेही वाचा – Black Fungus: महाराष्ट्रात काळ्या बुरशीने ४२१ जणांचा बळी, आतापर्यंत ३,९१४ रुग्णांची नोंद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -