घरमुंबई७ तासांची बैठक निष्फळ; बेस्ट कर्मचारी संप सुरुच राहणार

७ तासांची बैठक निष्फळ; बेस्ट कर्मचारी संप सुरुच राहणार

Subscribe

उद्या बेस्ट कामगारांचा मेळावा घेतला जाणार आहे. पुढची भूमिका बेस्ट कर्मचारीच घेणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.

बेस्ट कामगारांचा संप सुरुच राहणार आहे. गेल्या ७ तासापासून महापौर बंगल्यावर सुरु असलेली बैठक निष्फळ ठरली आहे. चर्चा निष्फळ, संप सुरुच राहणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले आहे. विलिनीकरणाला आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या ७ तासात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या मात्र विलिनीकरणाला प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांचा संप सुरुच राहणार आहे. उद्या बेस्ट कामगारांचा मेळावा घेतला जाणार आहे. पुढची भूमिका बेस्ट कर्मचारीच घेणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.

संप सुरुच राहणार 

आम्हाला अपेक्षा होते की काही तरी तोडगा निघेल मात्र ही बैठक सुध्दा निष्फळ ठरली आहे. सरळ पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यांच्याकडून काहीही लेखी आश्वासन दिले गेले नाही. आम्हाला खूप अपेक्षा होत्या की, या बैठकीत काही तरी तोडगा निघेल. मात्र विलिनीकरणाला आयुक्तांनी नकार दिला असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे. या बैठकीतून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी विचारपूर्वक निर्णय घेतला गेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. आमची अपेक्षा आहे की, अजूनही विचार करा. लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेतला जाईल असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

बेस्ट संप चिघळणार; तिसऱ्या दिवशीही संप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -