घरमुंबईबेस्ट संप चिघळणार; तिसऱ्या दिवशीही संप

बेस्ट संप चिघळणार; तिसऱ्या दिवशीही संप

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे देखील लक्ष घालणार असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील बेस्ट कामगारांची भेट घेणार आहेत.

गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या बसच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक होणार आहे. या बैठकीत काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने संप आणखी चिघळणार आहे. तसेच बेस्टचे कर्मचारी संपावर ठाम असून जोवर मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोवर संप सुरुच राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनला कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या माघारीमुळे संप चिघळणार

शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेतली होती. कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी कामावर रुजू होणार होते. मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव समोर आला आहे. त्यामुळे शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले आहेत.

- Advertisement -

बेस्ट संपात उद्धव ठाकरे लक्ष घालणार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्याहून परतल्यानंतर बेस्ट संपात उद्धव ठाकरेंनी उडी मारली आहे. सलग तीन दिवस सुरु असलेल्या बेस्ट संपामध्ये उद्धव ठाकरेंनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

कामगार घेणार राज ठाकरेंची भेट

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बेस्ट कामगारांची भेट घेणार आहे. कृष्णकुंजवर आज बेस्ट कामगार राज ठाकरेंची भेट घेऊन आपला मुद्दा मांडणार आहेत. त्यामुळे आता बेस्ट संप चिघळणार असून राज ठाकरे यात लक्ष घालणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -