घरCORONA UPDATECorona: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारची पालिकेला ३ कोटींची मदत

Corona: बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारची पालिकेला ३ कोटींची मदत

Subscribe

देशावर कोणतेही संकट आले की कलाकार मंडळी त्यांची दिलदार वृत्ती दाखवतात, असे आपण अनेकदा पाहिले आहे. बॉलीवूडमधला असा एक कलाकार आहे जो कोणत्याही राज्यात आपत्ती आली की, मदतीला धावून जातो, तो म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. जगभरात कोरोनाचे संकट असताना देशातही त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाची मदत ही लाखमोलाची ठरत आहे. अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला असून मुंबई महापालिकेला तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किटकरता हा निधी वापरण्यात यावा, या भावनेने अक्षयने ही मदत केल्याचे समजते. याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने २५ कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिले होते.

- Advertisement -

सामाजिक भान जपणारा कलाकार 

अक्षय कुमारने नेहमीच सरकार आणि शासनाच्य प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाही त्याने दिल से थँक्यू, म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान सहायता निधी दिल्यानंतर लगेचच बॉलीवूड कलाकारांचा मुस्कुराएगा इंडिया, हे मोटिव्हेट करणारा गाणेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातही अक्षयचा सहभाग होता. तसेच वेळोवेळी तो सोशल डिस्टन्सिंग ठेवा, संचारबंदीचे नियम पाळा, सतत हात धुवा, असे व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर टाकून लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत असतो. त्यामुळे अक्षय कुमारचे त्याच्या संकटसमयी केलेल्या मदतीसाठी चहूबाजूंनी त्याचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भारतात कोरोना पसरवण्याचा तबलीग जमातीचा कट; वसीम रिझवींचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -