घरमुंबईअंबरनाथ नगरपालिकेची प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई

अंबरनाथ नगरपालिकेची प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई

Subscribe

अंबरनाथ नगरपालिका आरोग्य विभागाच्या विशेष भरारी पथकाने गुरुवारी सकाळी अंबरनाथ येथील साईबाबा मंदिर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात महेंद्र पिकअप टेम्पोवर धाड टाकून अंदाजे ५७५ किलो वजनाच्या १७ बॅगसहीत प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या.

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात वापरल्या जात आहेत. अंबरनाथचे स्वच्छता निरिक्षक विनित पाटोळे यांना भ्रमणध्वनीवर यांना या संदर्भात अशीच एक माहिती मिळाली होती. या माहितीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका आरोग्य विभागाच्या विशेष भरारी पथकाने गुरुवारी सकाळी अंबरनाथ येथील साईबाबा मंदिर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात महेंद्र पिकअप टेम्पोवर धाड टाकून अंदाजे ५७५ किलो वजनाच्या १७ बॅगसहीत प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. ऐन गणेशोत्सव काळात ही वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई केली गेली आहे. या कारवाईमुळे प्लास्टीक कारखानदार-व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील विजय राज ट्रान्सपोर्टमधून पुणे येथील मे. शुभम प्लास्टिक, महादेव प्लास्टिक, यश प्लास्टिक आणि कविता प्लास्टिक येथे प्लास्टिक पिशव्या माल जात असल्याची खबर अंबरनाथ पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाला मिळाली. त्यानुसार रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात पहाटे चारच्या सुमारास स्वच्छता निरिक्षक विनित पाटोळे, गोपी जाधव, संजय गायवाड, मुकादम गोरख, आदीनी धाड टाकुन महेंद्रा पिकअप क्र. एमएच-०५-बीएच-५१०९ मधील अदांजे ५७५ किलो वजनाच्या १७ बॅगसहीत प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, स्वच्छता निरिक्षक सुहास सावंत, आणि टेम्पो चालक सागर परभणे यांच्या उपस्थितीत टेम्पोमधील १७ गोणी प्लास्टीक पिशव्या जप्त करून प्रदुषण मंडळाचे प्रमोद लोण यांच्या समक्ष कारवाई करून पुढील विल्हेवाटीसाठी माल जमा करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगरपालिकेने आतापर्यंत ‘इतका’ दंड वसूल केला

राज्यात प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने विशेष पथक नियुक्त करून मे १०१८ -१९ मध्ये १०७ वेळा कारवाई करून १८२ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून ५ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला आहे. तसेच सप्टेंबर २०१९ दरम्यान ४७ वेळा कारवाई करून २ लाख ३५ हजाराचा दंड वसूल केला आहे. दरम्यान गुरूवारी प्लास्टीक बंदी पथकाने मोठी धाड टाकून अंदाजे ५७५ किलो वजनाच्या १७ बॅगसहीत प्लास्टीक जप्त केले आहे. आतापर्यंत पालिकेने १५४ वेळा कारवाई केली. अंदाजे बाराशेहुन अधिक किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून एकुण ७ लाख ७० हजार रूपयाचा दंड वसूल केला असल्याचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील आणि स्वच्छता निरिक्षक सुहास सावंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -