घरमुंबईआनंद परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू नका; उच्च न्यायालयाचे आदेश

आनंद परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू नका; उच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी ही माहिती दिली. परांजपे यांच्या विरोधातील एकाच गुन्ह्यात कारवाई केली जाईल. अन्य दहा गुन्ह्यांबाबत  दोन आठवड्यात अहवाल सादर करु, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुढील आदेश येईपर्यंत परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करु नये, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांच्याविरोधात दाखल असलेल्या ११ गुन्ह्यांपैकी एकाच गुन्ह्यात कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितले.  परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करु नका, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यामुळे परांजपे यांना दिलासा मिळाला आहे.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी ही माहिती दिली. परांजपे यांच्या विरोधातील एकाच गुन्ह्यात कारवाई केली जाईल. अन्य दहा गुन्ह्यांबाबत  दोन आठवड्यात अहवाल सादर करु, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पुढील आदेश येईपर्यंत परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करु नये, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परांजपे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे, असे वक्तव्य आनंद परांजपे यांनी केले होते. तसेच ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले ते खरे गुन्हेगार आहेत. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या आणि कोणाची बदनामी त्यातून केली नाही, असे ट्विट आनंद परांजपे यांनी केले होते.

या ट्वीटनंतर बाळासाहेबांची शिवसेना गटाने आनंद परांजपे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख महेश गायकवाड, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात परांजपे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. त्यानुसार परांजपे यांच्याविरोधात भांदवि 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परांजपे यांच्याविरोधात एकूण ११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यातील एकाच गुन्ह्यात कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्याचवेळी न्यायालयाने परांजपे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश पोलिसांना दिले व ही सुनावणी तहकूब केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -