घरCORONA UPDATECoronavirus : धारावीत आणखी एका बळी, आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

Coronavirus : धारावीत आणखी एका बळी, आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

Subscribe

शनिवारी सकाळी डॉ. बलिगा नगर येथे ८० वर्षी रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडाच ४ वर पोहोचला आहे.

धारावीतही आता कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी धारावीत ६ नवीन रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुकुंद नगर येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिरांमध्ये याठिकाणी पाच कोरोनाग्रस्त आढळून आले, तर राजीव गांधी नगर येथील चाळीत एक रुग्ण आढळून आले होते. मात्र, शनिवारी सकाळी डॉ. बलिगा नगर येथे ८० वर्षी रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडाच ४ वर पोहोचला आहे.

धारावीतील डॉ बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ,  मुस्लिम चाळ, सोशल नगर, जनता सोसायटी, कल्याणवाडी, पीएमजीपी कॉलनी, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बलिगा नगर, सोशल नगर आणि कल्याणवाडी येथील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण मुकुंद नगर येथील आहे. या मुकुंद नगरमध्ये ९ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

धारावीत डॉ. बलिगा नगर येथे पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर निकटच्या संपर्कातील ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी दाखल रुग्णांपैकी ८० वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णाचे ते वडिल होते. त्यामुळे धारावीतील मृतांची संख्या आता ४ वर पोहोचली आहे.

धारावीत घरोघरी जावून स्क्रिनिंगला सुरुवात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, धारावीतील प्रत्येकाची प्राथमिक चाचणी करायला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्यासह काँग्रेसच्या आमदार व मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सहकार्याने जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धारावीतील खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घराघरांत जाऊन या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी धारावीतील मुकुंद नगर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली. या स्क्रिनिंग दरम्यान डिजिटल थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोंद करत आहेत. तसेच नुकताच केलेला प्रवास (ट्रॅव्हल हिस्टरी) आणि इतर प्रश्न विचारून नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. या स्क्रिनिंग दरम्यान कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्या नागरिकांची माहिती त्वरित पालिकेला देऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत बाधित आढळणाऱ्या नागरिकांना गरजेनुसार, अलगीकरण, विलगिकरण कक्षात ठेवण्यात येईल व रुग्णांवर उपचार केले जातील, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले

- Advertisement -

माहिम ३ रुग्ण आढळले

जी-उत्तर विभागातील माहिममध्ये ३ कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर पोहोचली आहे. माहिम पश्चिम येथील मोहम्मद छोटानी मार्गावर राहणाऱ्या ४३ वर्षीय मटन विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा वरळी, जिजामाता नगर येथे मटन विक्रीचा धंदा होता. तर सुश्रुषा रुग्णालयात एक दिवस आड डायलेसीस करता जाणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्रीच कॅन्डी येथील एका नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही नर्स माहिम वांजेवाडी येथील नर्स हॉस्टेलमध्ये राहायला होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -