घरताज्या घडामोडीअंबानी स्फोटक, हिरेन मृत्यू प्रकरण: काझीच्या भूमिकेचा NIAकडून खुलासा

अंबानी स्फोटक, हिरेन मृत्यू प्रकरण: काझीच्या भूमिकेचा NIAकडून खुलासा

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आढळल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काल सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझीला नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) मार्फत अटक करण्यात आली. त्यानंतर आज काझीला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. आता या दोन्ही प्रकरणात काझीची नेमकी भूमिका काय होती? याबाबतचा खुलासा एनआयएने केला आहे.

सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी ६ मार्चला एका ऑडी गाडीतून नागपाडा परिसरात गेले होते. ४ मार्चला मनसुखची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर ६ तारखेला वाझे आणि काझीने नागपाडा परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली आणि त्याच्याकडून एक बाटली पेट्रोल आणि हातोडी घेतली होती.

- Advertisement -

एनआयएच्या तपासादरम्यान एनआयएने ताब्यात घेतलेल्या एका मर्सिडीजमधून एक पेट्रोलची बाटली सापडली होती तर एका वोल्वो गाडीतून हातोडी जप्त करण्यात आली होती. नागपाडा परिसरातून त्या व्यक्तीकडून घेतलेल्या या हातोडीचा वापर डिव्हीआर आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यासाठी झाला असावा असा NIA ला संशय आहे. नागपाडा परिसरातल्या ज्या व्यक्तिकडून हे साहित्य वाझे आणि काझीने घेतले होते त्याच जबाब नोंद करण्यात आली आहे.

कोण आहे रियाझुद्दीन काझी?

२०१० साली एमपीएसीमधून काझी भरती झाला होता. पहिली काझीची पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्थानकात पीएसआय म्हणून करण्यात आली. तिथे काझीने प्रोबेशन पीरियडवर काम केले. त्यानंतर काही वर्षांनी काझीची अँटी चेन स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली झाली. मग यानंतर रियाझ काझीला सीआयआयूमध्ये पाठवले. मात्र आता अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आल्यामुळे सीआययूमधून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी: सचिन वाझे प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे एनआयए प्रमुख अनिल शुक्लांची बदली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -