घरमुंबईआफ्रिकन जातीचे बकरे चोरणारा अटकेत

आफ्रिकन जातीचे बकरे चोरणारा अटकेत

Subscribe

वसई पोलिसांची कारवाई

80 हजार रुपये किमतीचे दोन आफ्रिकन जातीचे बकरे चोरून ते अवघ्या चार हजार रुपयात विकणार्‍या चोरट्यासह बकरे विकत घेणार्‍याला वसई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बकरे विकत घेणारा आणि बकरेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

पापडी चोबरे येथे राहणारे जमीर खलीफ (36) यांचा बकर्‍या पालनाचा व्यवसाय असून सोमवारी रात्री त्यांच्या दुकानातील आफ्रिकन ब्रीडचे दोन बकरे चोरीला गेले होते. सकाळी जमीर दुकानात आले असता बकरे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी मंगळवारी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

सचिन महापदी आणि प्रवीण सोनार या वसई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी तात्काळ याबाबत तपास सुरु केला होता. यामध्ये तपास करीत असताना वसई पूर्वेकडील भालिवली गावात या दोन्ही बकरे पोलिसांना सापडले. दोन्ही बकरे नायगाव येथे राहणार्‍या निकेश सुतार या 20 वर्षीय तरुणाने चोरल्याचे निष्पन्न झाले.

80 हजार रुपये किंमत असलेल्या दोन बकरे निकेशने भालिवली येथील अमित वरठा याला अवघ्या चार हजार रुपयात विकले होते. याप्रकरणी पोलिसांनी निकेश आणि अमितला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले दोन्ही बकरेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -