घरमुंबईदिखावा नको, काम दिसू दे, आशिष शेलारांच्या मुंबई पालिका प्रशासनाला सूचना

दिखावा नको, काम दिसू दे, आशिष शेलारांच्या मुंबई पालिका प्रशासनाला सूचना

Subscribe

पावसात मुंबई तुंबू नये म्हणून नालेसफाईचे काम पालिका प्रशासनाकडून जोरात सुरु आहे. त्यावर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पालिका प्रशासनावर निशाणा साधला. दिखावा नको, काम दिसू दे, यावर्षी पावसाळा मुंबईकरांचा सुखाचा जाऊ दे, असं म्हणत आशिष शेलार यांनी काही सूचना केल्या आहेत.

मुंबईच्या नालेसफाईच्या कामांत होणाऱ्या दिरंगाईच्या विरोधात भाजपाने भोंगा वाजवताच प्रशासन जागे झाले. आता वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर उतरले. आमची त्यावर ही नजर आहेच.
काही सूचना.

- Advertisement -

१. गतवर्षी मिठी नदीचे पाणी उतरत नव्हते त्याचे कारण शोधून उपाययोजना व्हाव्यात.

२. नाल्यांसोबत पाथमुखांची सफाई व्हावी.. विशेषतः गिरगाव चौपाटीवरील व्ह्युईंग गॅलरीच्या बांधकामात गॅलरी खालील पर्जन्य जलवाहिनीत सिमेंट आणि बांधकाम साहित्य अडकलेले नाही ना? याची खात्री करावी. कारण गेली काही वर्षे गिरगावमध्ये पाणी तुंबू लागलं आहे.

- Advertisement -

३. नालेसफाईत पारदर्शकता असावी, कामांची आकडेवारी जाहीर करावी.

४. छोटे नाले, गटारे यांच्या साफसफाईकडे ही लक्ष देण्यात यावे

५. वृक्ष छाटणी होणे आवश्यक असून दरडी कोसळणाऱ्या भागात उपाय योजना ही आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -