घरताज्या घडामोडीअश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल महापालिकेत रुजू

अश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल महापालिकेत रुजू

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या अश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल यांनी महापालिका मुख्यालयात आपल्या पदाचा  पदभार स्वीकारला.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या अश्विनी भिडे आणि संजीव जयस्‍वाल यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात आपल्या पदाचा  पदभार स्वीकारला. यावेळी महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.

अश्विनी भिडे यांच्याविषयी

अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेतील २४ वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या विभागीय अतिरिक्‍त आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्‍त आयुक्‍तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव म्‍हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. त्‍याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून त्‍यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्‍याच्‍यादृष्‍टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्‍या निर्मितीत महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे. मेट्रो रेल्वेच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेनेलाच त्यांनी शिंगावर घेतल्याने त्या वादग्रस्त अधिकारी ठरल्या होत्या.

- Advertisement -

संजीव जयस्‍वाल यांच्याविषयी…

संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक आणि तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणूनही जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.


हेही वाचा – बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी BEST ची भन्नाट आयडिया

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -