घरताज्या घडामोडीबेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी BEST ची भन्नाट आयडिया

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी BEST ची भन्नाट आयडिया

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बस ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच लावण्यात आले आहे.

कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यासारखे हजारो कोरोना योद्धा लढत आहेत. या सर्वांना घरापासून हॉस्पिटल आणि कार्यालयापर्यंत सुखरूप ने-आण करण्याचे महत्त्वपूर्ण काम बेस्ट कर्मचारी जीवाची पर्वा न करता करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या ५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गपासून सुरक्षेसाठी प्रायोगिक तत्वावर बस ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)

पारदर्शक सुरक्षा कवच

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मात्र, बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आणि फेऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे बसेसमध्ये सोशल डिस्टिसिंगचे अनेकदा तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शुक्रवारपर्यंत बेस्टमधील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. तर चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक वाहतूक विभागाची आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने बेस्ट बस चालकांच्या सुरक्षेसाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. बेस्टकडून आता बस ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आली आहे. पारदर्शक सुरक्षा कवच हे विशिष्ट प्लास्टिक आहे.

- Advertisement -

आतापर्यंत ८ बसेसमध्ये प्रयोग

बेस्टच्या वडाळा डेपोतील ८ बसेसना पारदर्शक सुरक्षा कवच बसविण्यात आले आहे. बेस्टकडून प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात येत आहे. सध्या त्यानंतर अभ्यास करून टप्याटप्याने या बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरण्यात येत आहे. हे प्लास्टिक गुजरात राज्याचा वापीला तयार होते. त्यामुळे सध्या मटेरियल कमी असल्यामुळे फक्त तीन बसेसवर हा प्रयोग केला आहे, अशी माहिती बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लवकरच देणार कंत्राट

शहरातील बेस्ट बस प्रशासनाने आपत्कालिन आणि अत्यावश्यक सेवेत रुजू असणाऱ्या कामगारांना ने-आण करण्यासाठी बससेवा सुरू ठेवली आहे. अनेक कर्मचारी थेट प्रवाशानाच्या संपर्कात येत असल्यामुळे कोरोनाची लागण होण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बेस्टने बसमधून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा प्रयोग बेस्टकडून प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. लवकरच इतर पारदर्शक सुरक्षा कवच बसेसला लावण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्टच्या सूत्रांने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेच्या आयुक्तपदी सरकारने अनुभवी अधिकाऱ्यांना डावलले


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -