घरमुंबईवन अविघ्न पार्क अग्नितांडव; दोषींवर कठोर कारवाई करणार - अस्लम शेख

वन अविघ्न पार्क अग्नितांडव; दोषींवर कठोर कारवाई करणार – अस्लम शेख

Subscribe

वन अविघ्न पार्क इमारत दुर्घटनेची मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख गंभीर दखल घेतली असून घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास करी रोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीमधील १९ व्या मजल्याला आग लागली. स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरुण तिवारी नामक एका व्यक्तीने इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन उडी घेतल्याने त्याला आपल्या प्राणांना मुकावे लागले.

मंत्री शेख म्हणाले की, प्रत्येक इमारत प्रशासनाला यापुढे अग्नी सुरक्षा अहवाल दर सहा महिन्यांनी पालिकेला सादर करणं अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच उंच इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना देखील अग्नी सुरक्षाविषय प्रशिक्षण घेणं अनिवार्य करण्यात येणार आहे. इमारतींमधील अग्नीसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने अग्नीशमन विभाग व संबधित अन्य विभागांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री शेख यांनी शेवटी सांगितले.

- Advertisement -

अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्यास कारवाई – आदित्य ठाकरे

अविघ्न पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना आग विझवणाऱ्या स्प्रिंकल मधून पाणी कमी प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी का होता याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पर्यटन, पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

तसेच, उंच इमारती बनवताना त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सदर हायराईज इमारतीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. आग का व कशी लागली, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर संबधित दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -