Bandra Building Collapse: वांद्र्यातील इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर ५ जण जखमी

Bandra Building Collapse One killed, five injured
Bandra Building Collapse: वांद्र्यातील इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर ५ जण जखमी

मुंबईत रविवारी उशिरा पावसाने हजेरी लावली आणि इमारत दुर्घटनेला सुरुवात झाली. मुंबईतील वांद्रे भागातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कोणीही गंभीर नाही आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, वांद्रे पूर्व येथील खेरवाडी रोड परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला. रात्री १.४५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून १७ जणांची यातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका दिली आहे.

आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या अपडेटनुसार, आता पहाटेचे ६ वाजले आहेत. स्थानिक लोकं मानवी साखळ्या करून कोणती अडकले नाही आहे ना याची खात्री करत आहेत. तसेच मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्यामुळे अग्निशमन दलाला मलबा साफ करण्यासाठी स्थानिक लोकं मदत करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेला मागील तीन तासांपूर्वी घटनास्थळी कामगार पाठविण्याची विनंती केली होती. मात्र आतापर्यंत घटनास्थळी फक्त २ कामकार दाखल झाले आहेत.