Eco friendly bappa Competition
घर मुंबई वजन कमी करण्यासाठी नायरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर केली बॅरिअॅट्रिक सर्जरी

वजन कमी करण्यासाठी नायरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर केली बॅरिअॅट्रिक सर्जरी

Subscribe

जन्मतःच स्थूल असलेल्या १६ वर्षांच्या मुलीवर बॅरिअॅट्रिक सर्जरी नायर हॉस्पिटलमध्ये यशस्वी रित्या पार पडली. यामुळे तिची स्थूलतेपासून सुटका झाली आहे.

मुंबईतील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना १६ वर्षाच्या एका मुलीवर बॅरिअॅट्रिक सर्जरी करण्यात यश आलं आहे. तिला असलेल्या जन्मजात स्थूलतेपासून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया सुटका करण्यात आली आहे. दोन लाखांमागे एकाला होणाऱ्या जन्मजात स्थूलपणाच्या आजाराने अॅनी जेसन ही मुलगी ग्रस्त होती. तब्बल १४२ किलोपर्यंत या मुलीचं वजन होतं. तिच्या वाढलेल्या वजनामुळे अॅनीला चालणंही शक्य नव्हतं. पण, तिच्यावर बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे या मुलीला जीवदान मिळालं आहे.

शस्त्रक्रियेनंतर या मुलीचं वजन सात किलोने कमी झाले

या शस्त्रक्रियेनंतर या मुलीचं वजन सात किलोने कमी झाले आहे. जन्मापासून असलेल्या तिच्या स्थूलत्वामुळे तिचे वजन सतत वाढत होते. तिच्या आजारावर मात करण्यासाठी तिने वेटलिफ्टिंगही सुरू केलं. या स्पर्धेत ती अव्वल ठरुन राज्य स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदकही पटकावले. पण, त्यानंतरही तिचे वजन कमी नव्हते. या सर्व परिस्थितीमुळे तिच्या पायात व्यंग निर्माण झाले. त्यानंतर तिने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तिथे तिच्यावर बॅरिअॅट्रिक सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, सर्जरीसाठी ४ ते ५ लाखांचा खर्च येणार असल्याकारणाने जेसन कुटुंबाने डॉ. बोरुडे यांचा सल्ला घेतला. त्यानंतर बोरुडे यांनीच तिच्यावर बॅरिअॅट्रिक सर्जरी केली.

एक ते दीड लाखांमध्ये ही सर्जरी करता येणार

- Advertisement -

आता अॅनीने एका आठवड्यात तब्बल सात किलो वजन कमी केले आहे. तसंच, तिची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी अधिक माहिती देताना नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं की, “आता यापुढे नायर हॉस्पिटलमध्ये ही बॅरिअॅट्रिक सर्जरी केली जाणार आहे. एक ते दीड लाखांमध्ये ही सर्जरी करता येणार आहे.”

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -