घरताज्या घडामोडीबेस्ट देयकाचा भरणा मोबाईल व्हॅनवर; मालमत्ता कर, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा

बेस्ट देयकाचा भरणा मोबाईल व्हॅनवर; मालमत्ता कर, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून बेस्ट बस प्रवासी आणि विद्युत विभागाचे ग्राहक यांना विविध सेवासुविधा बहाल करण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमाकडून वीज देयकांचा भरणा करण्यासाठी ‘मोबाईल व्हॅन’ उपलब्ध करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅनवर बेस्ट वीज बिलासह पाणी, मालमत्ता कर भरणे, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कुलाबा बेस्ट भवन येथे येत्या गुरुवारी या ‘मोबाईल व्हॅन’ सुविधेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

बेस्ट उपक्रम खरे तर कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असून हा केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांनी विशेष प्रयत्न करून, ठोस आर्थिक मदत देऊन सदर तोटा लवकरात लवकर कमी करून बेस्ट उपक्रमाला नफ्यात न आणल्यास बेस्ट उपक्रम कोणत्याही क्षणी मान टाकून देईल. मात्र अशा बिकट आर्थिक संकटातही बेस्ट उपक्रम हा बस प्रवासी आणि वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी विविध योजना राबवत आहे.

- Advertisement -

मुंबईकरांच्या सेवेत बेस्ट देयकाचा भरणा सुलभतेने करण्यासाठी ‘मोबाईल व्हॅन’ उपलब्ध करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅनवर बेस्ट वीज बिलासह पाणी, मालमत्ता कर भरणे, फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या वीजदेयकाचे प्रदान सुलभ रीतीने करण्याच्या दृष्टीने भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे (NPCI) डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत एक्सपे या संस्थेद्वारा संचालित बीबीपीएस प्रणालीचा वापर करुन मोबाईल देयक भरणा केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. ज्याद्वारे वीजदेयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता कर देयके भरणे आणि इतर महापालिका सेवा कर, गॅस, डीटीएच क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, फास्ट टॅग रिचार्ज, सदस्यता शुल्क दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी यांच्या देयकांचे प्रदान केबल तसेच ब्रॉडबँड सेवांचे प्रदान, बेस्टच्या किऑस्क आणि इतर देयकांचे प्रदान करण्याकरिता मोबाईल देयक भरणा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.


हेही वाचा – ३ लाखांची लाच घेताना BMC अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -