घरमुंबई'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील भीम बिबट्याचा मृत्यू

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील भीम बिबट्याचा मृत्यू

Subscribe

रामदास आठवलेंनी दत्तक घेतला होता बिबट्या

बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव केंद्रात गेल्या ९ वर्षांपासून राहणाऱ्या भीम या नर बिबट्याचा सोमवारी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हृदयक्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून या बिबट्याला दत्तक घेतले होते. ‘भीम’च्या मृत्यूमुळे त्याचा भाऊ ‘अर्जुन’ आता एकटा पडला आहे.

उद्यानातील दोन्ही बिबटे बिबट्या केंद्राचे आकर्षण

गेल्या नऊ वर्षांपासून भीमचे वास्तव्य राष्ट्रीय उद्यानातील केंद्रात होते. २०१० मध्ये शहापूरमध्ये बिबट्याची दोन पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली होती. त्यांच्या आईचा कुठेच पत्ता न लागल्याने वन विभागाने अखेरीस त्यांची रवानगी बिबट्या बचाव केंद्रात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत त्यांना मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या ताब्यात देण्यात आले. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्यांचे नामकरण ‘भीम’ आणि ‘अर्जुन’ असे केले. तेव्हापासून हे दोन्ही बिबटे येथील बिबट्या केंद्राचे आकर्षण बनले होते. पण, सोमवारी यामधील ‘भीम’ बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने ‘भीम’ चा मृत्यू

तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने ‘भीम’ चा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक शवविच्छेदन अहवालाच्या माध्यमातून समोर आल्याचे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोगनिदानतज्ज्ञांकडून सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता या बिबट्याचे शवविच्छेदन केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, स्टोपाथोलॉजिकल विश्लेषणाकरिता त्याच्या पेशीचा काही भाग पुशवैद्यकीय महाविद्यालयाला दिल्याचे, ते म्हणाले.


आरेचे वारे खा..रे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -