घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला ४७२ केंद्रांवर होणार वेब कास्टिंग

नाशिकला ४७२ केंद्रांवर होणार वेब कास्टिंग

Subscribe

नाशिक जिल्हयातील एकूण मतदान केंद्राच्या दहा टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असून या केंद्रावर ऑनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे.

जिल्हयातील एकूण मतदान केंद्राच्या दहा टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असून या केंद्रावर ऑनलाईन मॉनिटरिंग केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी आता अवघे काही तासच शिल्लक असून त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून निवडणुक आयोगानेही या तयारीचा अंतिम आढावा घेतल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८२ हजार ५१ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १७ लाख २८ हजार ९७८ मतदार आहेत. या मतदारांकरीता ४७२० मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. नाशिक शहरात १९०८ मतदान केंद्रे आहेत. यंदा आयोगाच्या निर्देशानूसार दहा टक्के मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मतदान यंत्र आणि कर्मचारी सरमिसळ प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. मागील तीन टप्प्यातील मतदान प्रक्रियेचा अभ्यास करता मतदान यंत्र बंद पडल्याचे अनेक प्रकार समोर आले मात्र आपण याबाबत विशेष दक्षता घेउन प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी पुर्ण केली आहे. या तपासणी दरम्यानही काही मतदान यंत्र बंद पडली ती तातडीने बदलण्यात आली आहेत. जे मशिन बंद पडले ते जुन्या प्रकाराची आहेत आयोगाकडून यंदाच्या निवडणूकीसाठी ‘एम थ्री’ प्रकारातील मशिनस प्राप्त झाली असून त्यात या तांत्रिक त्रुटी जाणवणार नाही असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. परंतु मशिन बंद पडल्यास अर्ध्या तासात ते यंत्र बदलण्यात येईल. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मतदारांना आपले आयोगाच्या संकेतस्थळावर आपले नाव शोधता येईल. तसेच, मतदारांसाठी १९५० हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हयात ५३ क्रिटीकल केंद्रे आहेत या केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांनी नियुक्ती आयोगामार्फत करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.

- Advertisement -

इगतपुरीला स्वतंत्र स्ट्राँग रूम

प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मतदान यंत्र देण्यात आले आहे. तसेच मतदान यंत्र बंद पडल्यास १७ टक्के अधिक मतदान यंत्र देण्यात आले आहे. इगतपुरीचे मुख्यालय त्र्यंबक असल्याने अशा प्रकारचे काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास त्र्यंबकहून मतदान यंत्र येण्याची वाट बघत बसावी लागू नये याकरीता इगतपुरी येथेच स्वतंत्र स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -