घरमुंबईयुती होणार

युती होणार

Subscribe

मोदींच्या समोर उद्धव ठाकरेंची घोषणा

आम्हाला युती आणि सत्ता हवी आहे, पण सत्तेची हाव नाही. सत्ता हवी आहे, पण राज्याचा विकास करण्यासाठी हवी आहे. म्हणून हे सर्व प्रकल्प मुंबईकरांसाठी आणले आहेत त्याचा मला मनापासून त्याचा आनंद आहे, समाधान आहे आणि अभिमान आहे. एक चांगलं सरकार मजबूत सरकार येणार आहे. त्यासाठीच आम्ही मित्रपक्षाच्या मदतीने पुढे जात आहोत. येत्या महिन्याभरात आपण विधानसभेला सामोरे जात आहोत. युतीचेच सरकार येणार, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना भाजप-युती अभेद्य असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही युती कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. एमएमआरडीएच्या विविध योजनांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सगळ्यात जास्त टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजवल्या आहेत. मीदेखील नरेंद्र भाईंसमोर टाळ्या वाजवून घेतल्या आहेत. नरेंद्र भाई आप भी याद रखो असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. युती आहे, राहणार. करायच ते दिलखुलासपणे करायचं असेही ते म्हणाले. मित्रपक्ष म्हणून रामदास आठवले यांचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मित्रपक्षालासोबत घेऊन एक चांगले युतीचे मजबूत सरकार आणायचे आहे, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -