घरताज्या घडामोडीराणी बागेत 'पेंग्विन' टोळीच्या 106 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा, भाजपाची केंद्राकडे मागणी

राणी बागेत ‘पेंग्विन’ टोळीच्या 106 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा, भाजपाची केंद्राकडे मागणी

Subscribe

राणी बागेत परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत 106 कोटी रुपयांची अनियमितता झाली असून ही निविदा प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई महापालिकेतील भाजप नेते विनोद मिश्रा यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राणी बागेत परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत 106 कोटी रुपयांची अनियमितता झाली असून ही निविदा प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई महापालिकेतील भाजप नेते विनोद मिश्रा यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेत कंत्राटदारांच्या टोळीने आता परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याचे टेंडर काढले आहे. राणीबागेत जॅग्वार, चिता, पांढरा सिंह, चिंपांझी यांसारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा मागवल्या आहेत. महापालिकेच्या नियमानुसार 100 कोटींहून अधिक रकमेच्या निविदेत सहभाग घेता येतो, त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे दोन भाग झाले आहेत. या निविदेत अनियमितता होत असून, 100 कोटींहून अधिकच्या निविदा ठेकेदाराकडून भरल्या जाणार असल्याचे विनोद मिश्रा यांनी म्हटले आहे.  मिश्रा यांनी या संदर्भात 21 ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते. याबाबत मिश्रा म्हणाले, 29 नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्याच्या वेळी आम्ही व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे. हायवे (91 कोटी) आणि स्कायवे (94 कोटी) नावाच्या कंपन्यांनी अंदाजित दराने 60 टक्क्यांहून अधिक म्हणजे 100 कोटींहून अधिक रक्कमेच्या निविदा भरल्या आहेत.

- Advertisement -

अशाप्रकारे महापालिकेत पद्धतशीरपणे 106 कोटींहून अधिकचा घोटाळा होण्याची शक्यता आहे. 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींची निविदा सादर करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आणि पेंग्विन टोळीने अतिशय निकृष्ट काम केले असून या 106 कोटी रुपयांच्या लुटीबाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रारही केली आहे. महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने यासंदर्भात आम्ही केंद्रीय मंत्र्याकडे पत्राद्वारे तक्रार केली असल्याचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी सांगितले.


हे ही वाचा – HSC SSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -