घरताज्या घडामोडीHSC SSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड...

HSC SSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

Subscribe

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नसल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार्‍या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा बंद करण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम शिकवून झाला नाही. तसेच परीक्षांबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांना आवाहन केलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असे स्पष्टीकरण रविवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. सध्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये बराच गोंधळ आहे. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत, त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्यावतीने आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन दहावी बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आदी परीक्षा यांची तयारी, नियोजन आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची देखील माहिती घेतली होती. यावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नसल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार्‍या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

- Advertisement -

हेही वाचा : प्रत्येकानं बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, गायकवाडांचा अमृता फडणवीसांवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -