घरमुंबईआम्हाला बाजूला ठेवल्यामुळे फडणवीस पायउतार – एकनाथ खडसे

आम्हाला बाजूला ठेवल्यामुळे फडणवीस पायउतार – एकनाथ खडसे

Subscribe

आम्हाला जाणूनबुजून दूर ठेवले गेले. आज जर विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळेंना एकत्र घेऊन लढले असते, तर २५ जागा वाढल्या असत्या', असा हल्लाबोल फडणवीस सरकार गेल्यानंतर एकनाथ खडसेंनी केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत ‘आम्हाला घेऊन जर भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली असती तर आता एकहाती सत्ता आली असती. आम्हाला जाणूनबुजून दूर ठेवले गेले. आज जर विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळेंना एकत्र घेऊन लढले असते, तर २५ जागा वाढल्या असत्या’, असा हल्लाबोल फडणवीस सरकार गेल्यानंतर एकनाथ खडसेंनी पहिल्यांदा प्रसार माध्य भाजपवर केला आहे.

काय म्हणाले खडसे?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १२२ जागा आल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा आल्या आहेत. जर आम्हाला घेऊन लढले असते, तर नक्कीच २५ जागा वाढल्या असत्या, असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यामांशी बोलताना केला आहे. तसेच त्यांना अजित पवारांविषयी विचारणा केली असता, ‘सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे आम्ही रद्दीत केव्हाच विकले आहेत. कारण तेव्हा रद्दीला अधिक किंमत होती. तसेच दुर्दैवे, असे की, संख्याबळ असून देखील महायुती एकत्र मिळून सत्ता स्थापन करु शकली नाही.

- Advertisement -

उद्या होणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले बहुमत सिद्ध करत ‘महाविकास’आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असून आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे पक्षांच्या ,संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री होणार असून गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांने उद्धव ठाकरे शिवाजीपार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची तारीख बदलली!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -