घरमुंबईमहाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? – देवेंद्र फडणवीस

Subscribe

या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. आज मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला लाखो कार्यकर्ते दाखल झाले आहेत. दरम्यान, या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. भाजपकडून आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून या रॅलीला परवानगी दिली गेली नव्हती. अखेर ऑगस्ट क्रांती या मैदानात कायद्याच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली. रॅलीला परवानगी न दिल्या गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जे लोक देशापासून आझादी मागतात, त्यांना जुलूस करायला परवानगी आहे. जे सावरकरांचा अपमान करतात त्यांना जुलूस करायला परवानगी आहे. जे जाळपोळ करतात त्यांना जुलूस कराया परवानगी आहे. जे देशविरोधी नारे देतात त्यांना जुलूस करायला परवानगी आहे. महाराष्ट्राच्या सरकराचं डोकं ठिकाणावर आहे की नाही मला माहिती नाही. आमच्यासारखे शांततेने जे या देशाच्या अंतर्गत जो कायदा आम्ही तयार केला त्या कायद्याच्या समर्थनार्थ शांतपणे चौपाटीवर जाऊन त्याठिकाणी लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याची परवानगी आम्ही मागितली. ही परवानगी या देशामध्ये, मुंबईमध्ये हे सरकार जर नाकारत असेल तर मला हा प्रश्न विचारावाच लागेल, जो प्रश्न लोकमान्य टिळकांनी विचारला होता, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विरोधात देशात आंदोलने

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात रान पेटले आहे. ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये या कायद्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाला काही भागांमध्ये हिंसक वळण लागले असून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली जात आहे. दरम्यान, मुंबईत आझाद मैदानातही काही विद्यार्थी संघटनांनी या कायद्याच्या विरोधात आंदोलन पुकारले. तर दुसरीकडे भाजपकडूनही मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मंच नावाचे आंदोलन सुरु केले गेले. या आंदोलनाला स्वत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -