घरमुंबई'आता वेळ आहे बदला घेण्याची' - शेलार

‘आता वेळ आहे बदला घेण्याची’ – शेलार

Subscribe

लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वी जे लोक निवडणूक लढवणार नव्हते ते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्यांनी या आधीच हार मानली ते निवडणुका काय जिंकणार', असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

‘२०१४ ला तुम्ही सत्ता दिली. आता पुन्हा युतीला सत्ता देऊन बदला घ्या’. कारण मुंबईकरांना काही दिले तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात दुखत, असे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा देखील सत्ता द्या आणि विरोधकांचा बदला घ्या, असे वक्तव्य करत आशिष शेलाराने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर एकीकडे १८० फुटांच्या घरात राहिलेले अरविंद सावंत आहेत. तर एकीकडे २ हजार स्केअर फुटांच्या घरात राहणारे मिलिंद देवरा आहेत. तसेच एकीकडे गरिबांना मदत करणारे अरविंद सावंत आहेत तर दुसऱ्या बाजूला डिस्कनेट असलेले देवरा अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादीचं खरं हायं का?

‘लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील उरले सुरले काँग्रेस पाटील देखील अस्वस्थ आहेत. तसेच सांगली, सोलापूर आणि नगरच्या पाटीलांसह धनंजयच्या बिडच्या जयदत्त अण्णांबद्ल ऐकलं ते खरं हाय का?’ अस म्हणत आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस टोला लगावला आहे.

- Advertisement -

संजय निरुपम ओरिजिनल काँग्रेसचे नाही

सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘निवडणूक जाहीर होण्याआधी जे निवडणूक लढायला तयार नव्हते ते आज काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत, असे सांगत आधीच ज्यांनी हार मानली ते निवडणुका काय जिंकणार’, असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित करत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, ‘मला आता लढायचे नाही, प्रिया दत्त या देखील मी लढणार नाही’, असे म्हणाल्या होत्या. तर मला चालता येणार नाही, असे एकनाथ गायकवाड म्हणाले होते. मात्र आज ते निवडणूक लढत असल्याचे आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे. एवढंच नाही तर संजय निरुपम ओरिजिनल काँग्रेसचे नाही. संजय दिना पाटील भाजपाकडे येता येता राहिले. तर उर्मिला मातोंडकर यांचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे सांगत मुंबईच्या सहाच्या सहा जागा भाजपा-शिवसेनाच जिंकणार, असे देखील शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला? – आशिष शेलार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -