घरमुंबईतरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला? - आशिष शेलार

तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला? – आशिष शेलार

Subscribe

आशिष शेलार यांनी शिवाजी पार्क परिसरात एक शून्य दूसऱ्या शुन्याला भेटला असे ट्विटच्या माध्यमातून सांगत मनसेवर निशाणा साधत परत एकदा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील चर्चेला चांगलेच उधाण आल्याचे पहायला मिळत आहे. यासोबतच निवडणुकाजवळ येत आहेत तसे राजकीय वातावरणही चांगलेच तापत आहे. या दरम्यान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगताना बघायला मिळत आहे. आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मनसेला डिवचले आहे.

शेलारांचा मनसेवर निशाणा

गेल्या दोन दिवसांपुर्वी दादरमधील शिवाजी पार्क आवारात पहाटे मॉर्निंग वॉककरिता आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी कॉंग्रेसचे उमेद्वार एकनाथ गायकवाड हे आले होते. त्याचवेळी, प्रचारादरम्यान त्यांच्या सोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील त्यांच्या काही मनसैनिकांसह सहभागी झाले होते. यावरूनच आशिष शेलार यांनी मनसेवर चांगलाच निशाणा साधला आहे.

- Advertisement -

यावेळी, आशिष शेलार यांनी शिवाजी पार्क परिसरात एक शून्य दूसऱ्या शुन्याला भेटला असे ट्विटच्या माध्यमातून सांगत मनसेवर निशाणा साधत परत एकदा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या आशिष शेलार ट्विटमध्ये म्हणाले, ‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला.. गळ्यात गळे घालून प्रचार करू लागला.. पण उपयोग काय? शुन्याचा शुन्या बरोबर गुणाकार केला काय, किवा बेरीज केली काय, बाकी शुन्यच ! नाही आले “एकनाथराव” भेटीला. तरी फळे आली शिवाजी पार्कच्या बोरीला?’

- Advertisement -

यापुर्वी, आशिष शेलार यांनी मनसेला केलेले ट्विट चांगलेत जिव्हारी लागले होते. या ट्विटला उत्तर देताना, यावर मनसेने त्यांना ‘काळजी करू नका शेलार भाऊ’ म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली. या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले. म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले.. पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!!”, एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे” असा खोचक टोलाही शेलारांनी लगावला होता.

मनसेचे चोख प्रतित्युत्तर

या ट्विटला चोख प्रतित्युत्तर देण्यासाठी मनसेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून शेलारांना उत्तर दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -