घरमुंबईनाशिक लोकल रेल्वेच्या माध्यमातून भाजप करतेय निवडणुकीचे राजकारण

नाशिक लोकल रेल्वेच्या माध्यमातून भाजप करतेय निवडणुकीचे राजकारण

Subscribe

नोकरी आणि उद्योग धंद्यानिमित्त रोज मुंबईत ये-जा करणार्‍या नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गात सुरू करायची ‘नाशिकचीराणी’ मुंबईत येऊन दाखल झाली आहे. कसारा घाट अतिरिक्त इंजिनशिवाय पार करण्याच्या चाचणीनंतर ही राणी सेवेत दाखल होईल. येत्या निवडणुकीआधी ती मार्गस्थ व्हावी असा प्रयत्न सत्ताधार्‍यांचा आहे. यानिमित्त नाशिककरांना आपलेसे करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. रेल्वे मंत्रालयाने चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत ही गाडी तयार केली आहे. शनिवारी ती कुर्ल्याच्या शेडमध्ये येऊन दाखल झाली. आरडीएसओच्या चाचणीत ती यशस्वी व्हावी इतकाही धीर न ठेवता ती लागलीच सुरू करण्याचा अट्टाहास सत्ताधारी भाजपचा आहे. राजकीय भांडवल करण्यात पुढे असलेल्या भाजपसाठी ही रेल्वे म्हणजे एक पर्वणीच मानली जात आहे.

मुंबई- नाशिक प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या मार्गवर उपनगरीय सेवा सुरु करण्याची मागील कित्येक वर्षांपासून होती. ही मागणी मान्य करत रेल्वे मंत्रालयाने मुंबई-नाशिक लोकल सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून तांत्रिक अभ्यासही करून घेतला. रेल्वेच्या रिसर्च स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड डिझाईन ऑर्गनायझेशननेही (आरडीएसओ) मुंबई-नाशिक मार्गाची पाहणी केली. कसारा-इगतपुरीदरम्यानचा घाट नाशिक लोकलसेवा सुरू करण्यातील मुख्य अडथळा असल्याने या चाचणीला सर्वात महत्व आले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा असल्याने चाचणीत यशस्वी ठरल्यानंतर रेल्वे सुरू करण्याचा रेल्वेचा मानस होता. मात्र याघडीला अनेक अडचणी आहेत. यामुळे घाईने लोकच सुरू करणे रेल्वेने टाळले.

- Advertisement -

मात्र सत्ताधारी भाजपला निवडणुकीची घाई आहे. कुठल्याही परिस्थितीत ही लोकल निवडणुकीआधी सुरू करण्याचा अट्टाहास त्या पक्षाचा आहे. या रेल्वेच्या माध्यमातून निवडणुकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपच्या हटवादामुळेच रेल्वेने घाईघाईतच चाचणी घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकल सुरू झाली पाहिजे. पण ती घाईने नको. यामुळे प्रवाशांच्या जिविताचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

नाशिक लोकल मुंबई दाखल

- Advertisement -

मध्य रेल्वेत चालवल्या जाणार्‍या लोकलपेक्षा नाशिक लोकलची बांधणी वेगळीच आहे. कसाराइगतपुरीदरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये लोकल चालविण्यासाठी मध्य रेल्वेकडून चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनवण्यात आल्या आहेत. ज्यात अत्यावश्यक ब्रेक सीस्टीम्स बरोबरच उच्चदाब शक्ती इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना देण्यात आली आहे. शिवाय पार्किंग ब्रेकचीही सुविधा असणार आहे. यातील एक लोकल मुंबईच्या कुर्ला कारशेड मध्ये दाखल झाली आहे. लवकरच या लोकलचे तांत्रिक काम पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार आहे.

कल्याण आणि नाशिकच्या घाट सेक्शन मध्ये लोकल चालविण्यासाठी इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथून लोकल कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात आली आहे. या लोकलमधील तांत्रिक कामे करणे बाकी आहे. ते काम पूर्ण होताच घाट सेक्शन मध्ये या लोकलची चाचणी घेतली जाईल.
– ए. के. सिंह, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -