घरमुंबईराज्यात पहिल्यांदाच ब्लॉक चेन धोरण

राज्यात पहिल्यांदाच ब्लॉक चेन धोरण

Subscribe

राज्य सरकार येत्या दिवसांमध्ये ब्लॉक चेन तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन धोरण जाहीर करण्याच्या तयारीत आहे. ब्लॉक चेनसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा समाजालाही व्हावा म्हणून हे नवीन धोरण महाराष्ट्रात येऊ घातले आहे. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि शेती अशा विविध घटकांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने या तंत्रज्ञानासाठीचे धोरण महाराष्ट्रासाठी जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने नुकताच ब्लॉक चेन सँडबॉक्स उपलब्ध करून दिला आहे. तसेच नवउद्यमींना ब्लॉक चैन या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सर्व योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्याचा मानस राज्य सरकारने ठेवला आहे.

त्यामुळे आगामी काळात ब्लॉक चेनबाबतचे नवीन धोरण ठेवण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आरोग्य, शेती आणि शिक्षण यासारख्या सेवांसाठी चांगले पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या निमित्ताने आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात जी टी हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आले आहे. तर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शिवाय कृषी विभागाने वेअरहाऊस कॉर्पोरेशनमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पहिल्यांदाच डाळींबाच्या फळपिकाची होणारी निर्यात ही ऑनलाईन ट्रॅक करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त कालावधी लागल्याने नाकारली जाणार्‍या फळांचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल.

- Advertisement -

शेतकर्‍यांना मिळणारे तत्काळ कर्ज ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तत्काळ म्हणजे अवघ्या २४ तासांमध्ये कर्ज उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. याचा प्रायोगिक प्रकल्पातील प्रयोग म्हणून नुकत्याच एका शेतकर्‍याला कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी वेअरहाऊस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मदत घेण्यात आली आहे. आगामी काळात ब्लॉक चैन तंत्रज्ञानामुळे आणखी शेतकर्‍यांनाही तत्काळ कर्ज उपलब्ध होण्यासाठी मदत होईल अशी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस वी आर श्रीनिवासन यांनी दिली. अवघ्या पाच हजार रूपयांपासूनही शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.

ब्लॉक चैन तंत्रज्ञान म्हणजे काय?
ब्लॉक चेन हे रेकॉर्ड ठेवणारे एक तंत्रज्ञान आहे.जेव्हा एक ब्लॉक नवीन डेटा स्टोर करतो तेव्हा तो ब्लॉकचेनला जोडला जातो. नावाप्रमाणेच ब्लॉकचेनमध्ये अनेक ब्लॉक एकत्र बांधले गेलेले असतात. या ब्लॉकचेनमध्ये ब्लॉक बांधला जाण्यासाठी चार गोष्टी होणे आवश्यक आहे.
•हल्लीच्या ऑनलाईन खरेदीची तारीख, वेळ तसेच किंमतहा डेटा
• व्यवहार कोण करत आहे त्या व्यक्तीची माहिती
• ब्लॉक स्टोर माहिती जी एका ब्लॉकला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल
• एका ब्लॉकमध्ये साधारणपणे ट्रान्सक्शन स्टोर करण्याची क्षमता

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -