घरCORONA UPDATEजोगेश्वरीत फ्रान्सिसवाडी मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन!

जोगेश्वरीत फ्रान्सिसवाडी मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन!

Subscribe

जोगेश्वरी पूर्व येथील फ्रान्सिसवाडी मित्र मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यात एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती स्थानिक रहिवाशी आणि सक्रिय शिवसेना कार्यकर्ते उमेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटी छोटी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आजचे हे शिबीर घेण्यात आले.

jogeshwar blood donation camp1

- Advertisement -

नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक!

सध्या कोरोनाचे ढग गडद होत असून येणारा काळ आपल्या सर्वांसाठी खूपच खडतर असून प्रत्येकाने अधिक काळजी घ्यायला हवी आणि यासाठी शासनाने पारित केलेले नियम सर्वप्रथम आपण काटेकोरपणे पाळायला हवेत आणि आपल्यामुळे इतर कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये हा त्यापाठीमागे उद्देश आहे.

jogeshwar blood donation camp2

- Advertisement -

घरात राहिल्यानेच कोरोनावर विजय शक्य

‘संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आपल्या व्यवहारात,चालण्या-बोलण्या आणि वागण्यात एक ठराविक अंतर हवे आणि उगाचच अनावश्यक कामासाठी कोणीही घराबाहेर पडू नये आणि घरात राहिल्यानेच आपण या विषाणूवर विजय मिळवू शकतो, किंबहुना घराबाहेर पडून आणि एकमेकांत मिळसून नाही’, अशी प्रतिक्रिया २९ व्या वेळी रक्तदानासाठी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक गणेश हिरवे यांनी केलं. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आपण आगाऊ नोंदणी करून रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. राजेंद्र चंद्रहास यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -