घरताज्या घडामोडीBMC Budget 2021: मुंबईत जेंडर संवेदनशील शौचालय निर्मितीस पालिका सरसावली, अर्थसंकल्पात ३२३...

BMC Budget 2021: मुंबईत जेंडर संवेदनशील शौचालय निर्मितीस पालिका सरसावली, अर्थसंकल्पात ३२३ कोटींची तरतूद

Subscribe

सध्या आपण पाहतोय की, सार्वजनिक शौचालयात पुरुषांची शौचकूप (टॉयलेट सीट)या जास्त असतात. म्हणजेच जर सार्वजनिक शौचालयात तीन शौचकूपे असतील तर त्यापैकी दोन हे पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी असते. याच पार्श्वभूमीवर सर्वांना समान शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने सामुदायिक शौचालये अंतर्गत जेंडर संवेदनशील शौचालये मोहीम हाती घेतली. या मोहीमेच्या माध्यमातून पुरुष आणि महिलांना समान शौचालय देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे यंदाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात यासाठी ३२३.२० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचकूप असून त्यापैकी ८ हजार ६३७ नवीन शौचकूप आणि १४ हजार १३८ जुन्या शौचकूपांचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. महापालिकेचे डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकूप बांधण्याचे उद्दिष्ट असून ४ हजार ५९६ शौचूकुपे बांधून पूर्ण झालेली आहेत. सध्या १५ हजार ७०५ शौचकूपांचे बांधकाम सुरू आहे. मुलांसाठी मूत्रपात्र, जेष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पाश्चात्य पद्धतीच्या शौचकूपांचा सदर शौचालयात समावेश असणार आहे. शौचालयाच्या संकल्पनेत पावसाच्या पाण्याची साठवण, प्रकाश व्यवस्था, वॉश बेसीन, कोरड्या कचऱ्यासाठी आणि ओल्या कचऱ्यासाठी कचराकुंडी आणि सॅनिटरी पॅड्स इत्यादींचा समावेश करण्यात येईल. दरम्यान सदर शौचालये संपूर्ण स्वच्छतेसह आणि वापरकर्त्यांची प्रायव्हसी, सन्मान आणि सुरक्षा यांची काळजी घेऊन परिरक्षित करण्यात येतील.

- Advertisement -

महापालिकेचा १०८ स्वच्छतागृहे बांधण्याचा मानस

महापालिकेच्या २४ विभागांमध्ये झोपडपट्टी क्षेत्रांव्यतिरिक्त मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्यांसाठी १०८ स्वच्छतागृहे बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे. विशेष म्हणजे महिला, दिव्यांग इत्यादींकरिता अत्याधुनिक सुविधांसह सदर स्वच्छतागृह बांधण्यात येतील. यामध्ये काही खासगी सार्वजनिक भागीदारीने बांधण्यात येतील आणि काही महापालिकेच्या निधीमधून बांधण्यात येतील.


हेही वाचा – BMC Budget 2021: कोस्टल रोडसाठी मेगा बुस्टर, यंदा २ हजार कोटींची तरतूद

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -